Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत, या घटनेचा राग मनात ठेवून, माथेफिरूने स्वतःच्या मेव्हण्याच्याच डोक्यात कुऱ्हाड घालून त्याचा निघृण खून केल्याची खळबळजनक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. कन्नड तालुक्यातील तपोवन भागात माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना घडली आहे. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर हादरले आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणजीत अंकुश माळी असे मृत व्यक्तीचे नाव असून, नंदू गायकवाड असे आरोपीचे नाव आहे. या दोघांमध्ये पैशांच्या कारणावरून जोरदार भांडण झाले. (Sambhajinagar News) वाद विकोपाला गेल्यानंतर शिवीगाळ आणि मारहाण सुरू झाली. यातच आरोपी नंदू काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तू नेहमीच मला त्रास देतोस, तुला जास्त मस्ती आली आहे, आज तुझा काटाच काढतो, अशी धमकी देत तो संतप्त झाला.
या धमकीनंतर दोघांमधील वाद विकोपाला गेला आणि आरोपीने कुऱ्हाड काढली. संतापाच्या भरात त्याने मेहुणा रणजीत माळी याच्या मानेवर कुऱ्हाडीने दोन-तीन घाव घातले. (Sambhajinagar News) माळी मृत झाल्याचे कळताच आरोपी नंदू याने डोंगराच्या दिशेने पळ काढला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी मृताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून पिशोर पोलीस ठाण्यात नंदू गायकवाड विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.