Sahajpur News : उरुळी कांचन, (पुणे) : पुणे- सोलापूर महामार्गावरील सहजपुर (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत ट्रकचालकाचा गाडीवरील ताबा सुटून ट्रक चालकासह जुन्या बेबी कॅनलमध्ये पडल्याची घटना घडली आहे. रविवारी (ता. २८) पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या अपघातात ट्रकचालक जखमी झाला असून त्याच्यावर उरुळी कांचन येथील सिद्धिविनायक हॉस्पिटल या ठिकाणी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (A truck fell into the old baby canal at Sahajpur on the Solapur highway)
कस्तुरी प्रतिष्ठान ग्रुप व स्थानिक नागरिकांच्या तत्परतेने वाचले चालकाचे प्राण..
युनुस दस्तगीर मुजावार (वय- ४०, रा. मुरूम, ता. उमरगा, जिल्हा, उस्मानाबाद) असे अपघतात जखमी झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. या अपघातात मुजावर यांना दुखापत झाली असून कस्तुरी प्रतिष्ठान ग्रुप व स्थानिक नागरिकांच्या तत्परतेने अपघातग्रस्त चालकाचे प्राण वाचले आहेत. (Sahajpur News)
मिळालेल्या माहितीनुसार, युनुस मुजावर हे रविवारी सकाळी त्याच्याजवळ असलेली ट्रक घेऊन पुण्याच्या दिशेने निघाले होते. (Sahajpur News) पुणे- सोलापूर महामार्गावरील सहजपुर ग्रामपंचायत हद्दीतील माकर वस्ती येथे आले असता मुजावर यांचा ट्रकवरील ताबा सुटला त्यामुळे ट्रक चालकासह जुन्या बेबी कॅनलमध्ये पडली.
दरम्यान, सदर घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन येथील कस्तुरी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी तात्काळ अपघाताच्या ठिकाणी धाव घेत अपघातग्रस्त व्यक्तीला पाण्यातून बाहेर काढले. (Sahajpur News) सदर अपघतात ट्रकचे नुकसान झाले असून कस्तुरी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी व स्थानिक नागरिकांनी तब्बल एक तासाच्या प्रयत्नानंतर ट्रक चालकाला गाडीतून बाहेर काढले. पुढील उपचारासाठी उरुळी कांचन येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : दौंड तालुक्यातील अनिता मोरे यांना सहायक पोलिस आयुक्तपदी पदोन्नती