राहुलकुमार अवचट
यवत : विद्युत रोहीत्रांच्या तब्बल २४ चोरीच्या गुन्ह्यातील टोळीप्रमुख सागर पवारला यवत पोलिसांनी वाळकी (ता. दौंड जि. पुणे) येथून गुरुवारी (ता.१२) अटक केली आहे. पोलिसांनी या अगोदर विद्युत रोहीत्रांच्या चोरीतील १४ जणांना अटक केली आहे. अशी माहिती यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली आहे.
सागर गोरख पवार (वय २५ रा. वाळकी ता. दौंड जि.पुणे मुळ रा. राहुरी रेल्वे स्टेशन जवळ जि. अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याअगोदर पोलिसांनी सागर पवार याच्या टोळीतील इतर साथीदार दत्ता अशोक शिंदे (वय २८ वर्षे रा. राहु, थोरली विहीर ता. दौंड जि. पुणे), राज मच्छिंद्र वानखडे( वय १९ वर्षे रा. केडगाव म्हसोबाचा मळा ता. दौंड, जि. पुणे. मुळ रा. बिडगाव ता. मुर्तुजापुर जि. अकोला), विशाल मनोहर सोनवणे( वय ३० वर्षे रा. सासवड ता. पुरंदर, जि. पुणे), महादेव उर्फ सोन्या कमलाकर पवार(वय २९ वर्षे, रा. केडगाव, ता. दौंड, जि. पुणे), लखन रमेश दोरके (वय २७ रा. समतानगर राहू ता. दौंड जि. पुणे), सचिन बबन बरडे (वय रा. राहू वाकण वस्ती ता. दौंड जि. पुणे मुळ रा. वैजापूर स्वस्तिक टॉकीज जवळ जि. औरंगाबाद), इस्राक इर्शाद अली (वय ३८ रा. शिक्रापूर चाकण रोड CNG पंपासमोर ता. शिरूर जि. पुणे मुळ रा. कन्हारिया बुजुर्ग ता. महाराजगांज जि. लक्ष्मीपुर उत्तरप्रदेश ( रिसिव्हर), निवृत्ती उर्फ मामा श्यामराव खळदकर (वय ३२ रा. नानगाव ता. दौंड जि. पुणे), अक्षय सूर्यकांत उर्फ सुरेश खळदकर (वय २४ रा. नानगाव ता. दौंड जि. पुणे), सुरज प्रकाश जाधव (वय २३ रा.नानगाव ता. दौंड जि. पुणे), अर्जुन दिलीप बर्डे (वय २० रा. राहूरी रेल्वे स्टेशन झोपडपट्टी ता. राहुरी जि. अ. नगर स. रा. वाडेबोलाई ता. हवेली जि. पुणे), विकास गौतम बनसोडे (वय २३ रा. नानगाव ता. दौंड जि. पुणे), पांडुरंग ऊर्फ भावड्या मोहन गायकवाड (वय २३ रा. वडगाव रासाई ता. शिरूर जि. पुणे), लईक ऊर्फ लाला मोहम्मद अमीन मणियार (वय २१ रा चिखली (रिसिव्हर) ता हवेली जि पुणे मु. रा गोंडा उत्तर प्रदेश) यांना या गुन्ह्याचे प्रकरणी यापूर्वी अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये डी.पी. ट्रान्सफार्मर चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सन २०२१ व सन २०२२ मध्ये वाढ झाली होती. त्यावेळी यवत गुन्हे शोध पथकाने पुणे ग्रामीण जिल्ह्यातील डीपी ट्रान्सफार्मर चोरीचे ४६ गुन्हे उघडकीस आणून ५ टोळ्या जेरबंद करून २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. त्यापैकी दत्ता शिंदे (रा.राहू ता. दौंड जि. पुणे) याचे टोळी कडून २८ गुन्हे उघडकीस आणण्यात आले होते, तेव्हा पासून सागर पवार हा फरार झाला होता.
दरम्यान, आरोपी सागर पवार हा गुरुवारी (ता.१२) वाळकी येथे येणार असल्याची माहिती यवत पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून आरोपी सागर पवार याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
ही उल्लेखनीय कामगिरी यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार निलेश कदम, गुरुनाथ गायकवाड, अक्षय यादव आणि होमगार्ड कमलेश भालेराव यांच्या पथकाने केली आहे.