Sad News | छत्रपती संभाजीनगर : लिफ्टमध्ये मान अडकून एका 13 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमधून समोर आली आहे. लिफ्टचा दरवाजा अचानक बंद झाल्याने ही दुर्घटना घडली आहे. लिफ्टच्या गेटमध्ये मुलाचा गळा अडकल्याने तो कापला गेला त्यामध्येच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
साकीब सिद्दिकी इरफान सिद्दिकी असे लिफ्टमध्ये मान अडकून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
या घटनेनंतर कुटूंबियांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेची माहिती मिळताच जिन्सी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. साकीबचा मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केल्यानंतर घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, घटनेच्यादिवशी साकिबचे आई वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यामुळे साकीब आजी आजोबांकडे राहायला गेला होता. तो रविवारी तिसऱ्या मजल्यावर खेळत होता.
खेळून झाल्यावर साकिब लिफ्टमध्ये गेला त्यानंतर लिफ्ट अचानक सुरु झाल्यामुळे त्याचा गळा लिफ्टच्या दरवाज्यामध्ये अडकला. यामध्ये त्याचा गळा कापला गेल्या व त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Cyber Crime | आभासी चलनात गुंतवणूक करणं पडलं महागात; व्यावसायिकाची तब्बल एक कोटींची फसवणूक