Rural Police News : लोणी काळभोर, (पुणे) : लेण्याद्री, कान्हूर मेसाई, शिक्रापूरसह जिह्यातील नावाजलेल्या मंदिरामध्ये चोरी करणाऱ्या म्होरक्यासह आंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आवळल्या आहेत. आरोपींनी आजपर्यंत एकूण ३२ गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण) शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली आहे.
पोलिसांनी चांदीच्या गणपती मुर्ती सह ४ लाख ६७ हजार रुपयांचे चांदीचे दागिने हस्तगत
भास्कर खेमा पथवे (वय ४६, रा. नांदुर दुमाला ता. संगमनेर जि. अहमदनगर) असे टोळीच्या म्होरक्याचे नाव आहे. त्याला पोलिसांनी घोडेगाव परीसरातून पथकाने ताब्यात घेतले. सोमनाथ शिवाजी भुतांबरे (वय २४, रा. समशेरपुर ता. अकोले जि. अहमदनगर), राजेंद्र रघुनाथ कपिले (वय – ६२, रा. संगमनेर ता. संगमनेर जि. अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सोमनाथ भुतांबरे याने चोरी केलेले चांदीचे दागिने राजेंद्र कपिले याला विकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींकडून पोलिसांनी चांदीच्या गणपती मुर्ती सह ४ लाख ६७ हजार रुपयांचे चांदीचे दागिने हस्तगत केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड विभागातील मंदिर चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्या अनुशंघाने एक पाठक तयार तपास करीत असताना मंदिर चोरीतील गुन्हयाचे घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून बातमीदारामार्फत आरोपींची ओळख पटविली.
गुन्हयातील चोरटे हे सराईत असून वेगवेगळया जिल्हयाचे रेकॉर्डवरील आहेत अशी माहिती एका खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली होती. त्या आरोपींचा शोध घेतना टोळीचा म्होरक्या भास्कर पथवे याला घोडेगाव परीसरातून ताब्यात घेतले. त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने जुन्नर, मंचर, कान्हूर मेसाई, लेण्याद्री येथील मंदिरात सोमनाथ भुतांबरे याचे मदतीने चोरी केल्याची माहिती दिली. आरोपींकडून पोलिसांनी चांदीच्या गणपती मुर्ती सह ४ लाख ६७ हजार रुपयांचे चांदीचे दागिने हस्तगत केले आहेत.
दरम्यान, आरोपींनी पुणे जिल्हयातील चार गुन्हे केल्याची तसेच अहमदनगर व नाशिक जिल्हयातील मंदिर घरफोडी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
सदराची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, पोलीस हवालदार दिपक साबळे, जनार्दन शेळके, योगेश नागरगोजे, विक्रम तापकीर, राजु मोमीण, अतुल डेरे, पोना संदिप वारे, अक्षय नवले, निलेश सुपेकर, व जुन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार, पोलीस हवालदार सुनील शिंदे, विलास लेंभे यांनी केली आहे.