Nagar News : अहमदनगर : झेंडीगेट येथे कत्तलीसाठी आणलेल्या तीन गोवंशीय जनावरांची कोतवाली पोलिसांनी सुटका केली आहे. जनावरांची वाहतूक करणारा पिकअप कोतवाली पोलिसांनी मंगळवारी रात्री पकडला आहे. या वेळी पोलिसांनी पिकअपसह सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.(Nagar News)
पिकअपसह सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताब हारुण शेख (वय २२, रा. घोडेगाव, ता. नेवासा, जि. अहमदनगर) याच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ चे कलम ५ (ब) ९ सह प्राणी क्लेष प्रति अधि १९६० चे कलम ११ प्रमाणे पोलीस शिपाई अमोल दिलीप गाढे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोतवाली पोलिसांनी १ मार्चपासून आतापर्यंत वेळोवेळी छापे टाकून १९ गुन्हे दाखल करून ५१,१७,०४५ रूपयांचा माल जप्त केला आहे.(Nagar News)
कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव हे पथकासह रात्र गस्तीवर असताना कत्तलीसाठी गोवंशीय जनावरांचा पिकअप झेंडिगेट येथे येत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक यादव आणि गुन्हे शोध पथकाने (एम.एच.२० ए. टी. ७२५८) पांढऱ्या रंगाच्या पिकअपला पकडले. पिकअपमध्ये दोन जर्शी गाई व एक वासरु कत्तलीसाठी आणल्याचे आढळून आले.(Nagar News)
याप्रकरणी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गणेश धोत्रे पुढील तपास करीत आहेत. पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कालकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, सतिष भांड, योगेश भिंगारदिवे, रियाज इनामदार, सलीम शेख, सुजय हिवाळे, अमोल गाढे, संतोष जरे यांनी ही कारवाई केली आहे.(Nagar News)