पुणे : प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणीवर बला-त्कार करून त्या क्षणांचे छायाचित्रे सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिल्या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय बाळू शितापे (वय २१, रा. माळीनगर, अकलूज, जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका पिडीत तरुणीने स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
स्वारगेट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजय आणि युवती हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे होते. त्यानंतर आरोपीने पिडीत तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले व तिच्यावर बला-त्कार केला.
तसेच आरोपीने ”त्या” क्षणांचे युवतीचे छायाचित्र काढले. आरोपीने तरुणीला छायाचित्रे समाजमाध्यमावर प्रसारित करण्याची धमकी देऊन तिच्या नात्यातील एकास छायाचित्रे पाठविली.
दरम्यान, याप्रकरणी पिडीत तरुणीने स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार आरोपीच्या विरोधात बदनामी आणि बला-त्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव करीत आहेत.