पुणे : पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीला धमकी देऊन बलात्कार केल्याची घटना घडली आहे. संबंधाची माहिती घरच्यांना सांगण्याची धमकी देऊन 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला भेटण्यासाठी बोलावून घेत तिच्यासोबत जबरदस्ती बलात्कार केला. याबाबत पीडित 16 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या 32 वर्षीय आईने शुक्रवारी (दि.15) पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
यावरून 20 वर्षाच्या तरुणाला आणि त्याला मदत करणाऱ्या साथीदारावर पर्वती पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. संकेत मल्हारी शिंदे (वय-20), विजय यल्लाप्पा नारायणकर (वय-25), यश राजेंद्र जाधव (वय-26 तिघे रा. जनता वसाहत, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. हा प्रकार मे 2023 ते 15 मार्च या कालावधीत पीडित मुलीच्या राहत्या घराजवळ असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असून देखील संकेत शिंदे याने तिला लग्नाचे आमिष दाखवले. माझे तुझ्यावर प्रेम आहे मी तुझ्यासोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. तसेच तिला भेटण्यासाठी बोलावून घेतले. भेटायला आली नाहीस तर आपल्यात यापूर्वी झालेल्या संबंधाची माहिती तुझ्या घरच्यांना देईन अशी धमकी आरोपीने दिली.
पीडित मुलगी संकेत याला भेटण्यासाठी गेली असता त्याने पत्र्याच्या शेडमध्ये नेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तर विजय आणि यश यांनी आरोपी संकेत याला मदत केली. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्यादी दिली आहे. त्यावरून पोलिसांनी दोघांना अटक केली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक घावटे करीत आहेत.