Rajgurunagar Crime | राजगुरुनगर, (पुणे) : शेतातील गुरे सायंकाळी घरी घेवून परतत असताना बिबट्याने केलेल्या हल्यात एका सतरा वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. धुवोली (ता. खेड) (Rajgurunagar )ग्रामपंचायत हद्दीत ही घटना सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
अजय चिंतामण जठार असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
नुकतीच बारावीची परिक्षा दिली…
मिळालेल्या माहितीनुसार, अजय जठार याने नुकतीच बारावीची परिक्षा दिली होती. अजय हा महाविद्यालयात शिक्षण घेत होता. तो शुक्रवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मित्रा सोबत गुरे आणण्यासाठी रानात गेला होता.
तो जनावरे घेऊन जात असताना तिथे झाडीत दबा धरून बसलेल्या बिबट्याने अजय याच्या नरडीचा चावा घेतला. या घटने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. अजय याने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती.
या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. आता पुढील कारवाई करण्याचे काम सुरू आहे. बिबट्याच्या हल्ल्याची पश्चिम भागातील ही दुसरी घटना आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, या भागात बिबट्याचे वास्तव्य वाढत असून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने ठोस उपाय योजना करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
गोडवली येथील तापनेश्वर मंदिर परिसरात झाले बिबट्याचे दर्शन
बिबट्याची चाहूल अलार्मने होणार, विज्ञान प्रयोगातून विद्यार्थ्य़ांचा यशस्वी प्रयोग
लडकतवाडी येथे शिकारीसाठी लावलेल्या जाळ्यात अडकून बिबट्याचा दुर्दैवी मृत्यु