पुणे : लोणावळा पुणे रस्त्यावर ‘पुष्पा’ स्टाईलने अवैध मदयवाहतूक करण्याऱ्या ट्रकचा पुणे विभागाच्या उत्पादन शुल्क पथकाने थरारक पाठलाग करून बंदी असलेल्या विदेशी मद्यचा साठा जप्त केला आहे.
सविस्तर वृत्त असे की अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पुणे यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, तळेगाव विभाग, पुणे या कार्यालयाच्या पथका मार्फत दिनांक-०६/०७/२०२२ रोजी मुंबई-बेंगलोर एन एच-४ महामार्गावर मौजे वळवन गावच्या हददीतून जाणारया जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील लोणावळातून जाणारया बाहय रस्त्याच्या बाजूला लोणावळा पुणे या परिसरात सापळा लावून गोवा राज्य निर्मित व फक्त गोवा राज्यात विक्रीकरीता असलेल्या विदेशी मदयाची पुष्पा चित्रपटातील स्टाईलने अवैधरीत्या वाहतूक करणारा टाटा कंपनीचा एक एलपीटी २५१५ प्रकारचा दहाचाकी ट्रक क्र. आर.जे २७ जीए ७२५६ जप्त करुन कारवाई करण्यात आली.
सदर ट्रकची तपासाणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हयातील मुद्देमाल मिळून आला तो येणेप्रमाणे फक्त गोवा राज्यात विक्री करता निर्मित असलेले विदेशी मदय व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेल्या व फक्त गोवा राज्यात विक्री करता निर्मित असलेले विदेशी मद्याच्या ५९,०९,१४०/- इतक्या किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला.
याशिवाय रोख रक्कम भ्रमणध्वणी संच, दोन निळया रंगाच्या ताडपत्री असा सर्व टाटा कंपनीचा एक एलपीटी २५१५ प्रकारचा दहाचाकी ट्रक क्र. आर.जे २७ जीए ७२५६ इत्यादी मुद्देमाल ताब्यात घेतला.
या प्रकरणी बाबुलाल गेवरचंद मेवाडा, वय ५२ वर्षे, ( व्यवसाय ट्रक चालक रामु रतनपुरा पो बदनुर ता. आशिद जि. भिलवाडा राजस्थान, संपतलाल भवरलाल मेवाडा (वय ३० वर्षे व्यवसाय-ट्रक क्लिनर रा रतनपुरा पो. बदनुर ता. आशिंद जि. भिलवाडा राजस्थान ) यांना अटक केली. इतर संशयित आरोपी फरार घोषीत आहेत. त्यांच्या विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (ए) (ई) ८१.८३, व ९० अन्वये आरोपीस अटक करुन त्यांचे विरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
या कारवाईत संजय सराफ, निरीक्षक, तळेगाव दाभाडे, पुणे व डी एस जानराव, निरीक्षक, एफ विभाग पिंपरी पुणे, एस बी पाटील, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, बी विभाग, ठाणे व त्यांचा स्टाफ, श्रीमती स्वाती भरणे. श्री. प्रमोद कांबळे, श्री. एन. आर. मुंजाळ, श्री. ए.पी. बडदे, श्री. आशिष जाधव दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पुणे. श्री. डी.बी. गवारी, श्री. आर.सी. लोखंडे, श्री. एस. वाय. दरेकर सहाय्यक दुय्यम निरीक्षक, सर्वश्री जवान श्री. रसुल काद्री, श्री. एस.डी. गळवे, श्री. श्री. एम. आर राठोड, श्री. भागवत राठोड, श्री. अक्षय म्हेत्रे श्री. रावसाहेब देवतुळे, श्री. अतुल बारंगुळे, श्री. हनुमंत राऊत आदींनी सदरच्या सहभाग घेतला. सदर गुन्हयाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक श्रीमती एस. टी. भरणे हे करीत आहेत.