पुणे : बांबू, टोपल्या विक्री करण्याच्या बहाण्याने टेहाळणी करुन चंदनाची झाडे नेमकी कुठे लावण्यात आली आहे याबाबत माहिती घेऊन रात्रीच्या वेळी ही चंदनाची झाडे कापून चोरी करणाऱ्या टोळीस जेरबंद करण्यात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकास यश आले आहे.
रात्रीच्या वेळेस चंदनाची झाडे कापून चोरी करणाऱ्या टोळीस पुणे पोलिसांनी सिनेस्टाइल अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या पथक ३ ने ही कारवाई केली. याप्रकरणी ४ आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून एकूण ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लहू तानाजी जाधव (वय 32), महादेव तानाजी जाधव (वय 30), हनुमंत रमेश जाधव (वय 30) आणि रामदास शहाजी माने (वय 28) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून चंदनाचे झाड कापण्याकरता लागणारी हत्यारे, तीन वाकस, गिरमिट, कुऱ्हाड, रिकामी पोती असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपी अशोक मच्छिंद्र तांदळे (वय ३०, रा.कोल्हेवाडी, ता.हवेली,पुणे) याला अटक करण्यात आली आहे. यावेळी त्याने एनडीए मधील चंदनाचे झाडाचे खोड त्याच्या साथीदाराने कापुन चोरल्याचे कबूल केले. त्याने हे झाड चौफुला येथील एका व्यापाऱ्यास विकल्याचे सांगितले. पोलिस आरोपीच्या घरी गेले, पण तो घरी नव्हता. त्याची पत्नी उषा करडे हिच्या ताब्यातून ८५ किलो चंदनाचे लाकुड व एक इलेक्ट्राॅनिक वजन काटा जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांना पुण्यातील सिंहगड रोडवरील पु,ल.देशपांडे उद्यानाजवळ पुणे शहरात चंदनाची झाडे चोरी करणारे इसम हत्यारासह थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली. त्यांच्या ताब्यातून चंदन चोरीसाठी वापरण्यात येणारे साहित्य ही जप्त करण्यात आले. यावेळी त्यांची चौकशी केली असता त्या मागे मोठी टोळी असल्याचे पुढे आले. आरोपींकडून दहा किलो चंदनाचे झाड व करवत जप्त करण्यात आले आहे.