Pune Scame पुणे, ता. 23 : शहरात ऑनलाईन फसवणुकीचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, मॅट्रिमोनियल वेबसाईटवर बनावट प्रोफाइल तयार करून स्वतःला ‘इस्रो सायंटिस्ट’ असल्याचे भासवणाऱ्या एका तोतया व्यक्तीचा येरवडा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात तब्बल 26 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.Pune fraud

या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आदर्श प्रशांत म्हात्रे (रा. अलिबाग/पनवेल) याला अटक करण्यात आली आहे. चौकशीत आरोपीविरोधात मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पुणे येथे अशाच प्रकारच्या तब्बल 12 फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचे उघड झाले आहे. Pune fraud

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मॅट्रिमोनियल प्लॅटफॉर्मवर इस्रोमध्ये कार्यरत सायंटिस्ट असल्याचे भासवणारे फेक प्रोफाइल तयार केले होते. लग्नाच्या उद्देशाने संपर्क साधत त्याने पीडित महिलेचा विश्वास जिंकला. विशेष म्हणजे, महिलेच्या मुलीच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याचे आश्वासन देत आरोपीने भावनिक जाळे विणले. यानंतर विविध कारणे सांगत आरोपीने संबंधित कुटुंबाला कर्ज (लोन) घेण्यास भाग पाडले आणि टप्प्याटप्प्याने ऑनलाईन व्यवहारांद्वारे 26.5 लाख रुपये उकळले. पैसे घेतल्यानंतर आरोपीने संपर्क तोडल्याने फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. Pune fraud
धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीने घटस्फोटीत महिलेचा विशेषतः फायदा घेत तिच्या परिस्थितीचा गैरफायदा करून विश्वास संपादन केला. “मी इस्रोमध्ये सायंटिस्ट आहे, तुमच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी माझी,” असे सांगत त्याने महिलेची फसवणूक केली. दरम्यान, येरवडा पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला असून, अशा ऑनलाईन फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. Pune fraud







