Pune Railway Station पुणे : नो पर्किंगमध्ये लावलेल्या रिक्षावर महिला पोलीस कारवाई करीत असताना, रिक्षाचालकाने ई चलन मशीन काढून घेऊन स्वत:च्या अंगावर ब्लेडने वार केल्याची धक्कादायक घटना पुणे स्टेशनच्या (Pune Railway Station) इन गेटजवळ सोमवारी (ता.१०) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. (Pune Railway Station) याप्रकरणी पोलिसांनी रिक्षाचालकाला सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरुन अटक केली आहे. (Pune Railway Station)
बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
वृषभ बाबा पिसे (वय २३, रा. येरवडा) असे अटक अटक करण्यात आलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी महिला पोलीस अंमलदार दिपमाला राजु नायर यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृषभ पिसे हा रिक्षा घेऊन नो पार्किंगमध्ये थांबला होता. फिर्यादी नायर या ई चलन मशीनद्वारे त्या परिसरात कर्त्यव्य बजावीत होत्या. दरम्यान, कारवाई होऊ नये म्हणून पिसे याने त्यांच्याकडील ई मशीन हिसकावून घेतली. आणि फिर्यादी यांना बघुन घेतो, असे म्हणून स्वत:चे अंगावर ब्लडने वार करुन घेतले.
दरम्यान, याप्रकरणी महिला पोलीस अंमलदार दिपमाला राजु नायर यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी आरोपी वृषभ पिसे याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमारे करीत आहेत.