Pune Police | पुणे : आतापर्यंत पुणे शहरात गुडांनी तलवारी हातात घेऊन दहशत माजविल्याचे अनेक उदाहरणं बघतली आहेत. मात्र आता पुण्यात पोलीस कर्मचाऱ्याच्या हातात तलवार बघालया मिळाली आहे. पुणे पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्याने भर रस्त्यात तलवार उगारून दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आली आहे. दारुच्या नशेत या कर्मचाऱ्याने हे कृत्य केले आहे. शहरातील विश्रांतवाडी परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेनंतर शहर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
करण जाधव असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून तो मुंढवा वाहतूक शाखेत कार्यरत होता.
मद्यधूंद अवस्थेत असताना करण जाधवने धानोरीतील जाणता राजा चौकात जाधव तलवार घेऊन दहशत माजवली. याप्रकरणी जाधव याच्या विरुद्ध विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर जाधव याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दारुच्या नशेत असलेल्या पोलीस कर्मचारी जाधव याने धानोरीतील जाणता राजा चौकात जाधव तलवार घेऊन दहशत माजवली. तसेच परिसरात गोंधळ घातला. या घटनेची दखल घेत तात्काळ वाहतूक शाखेचे पोलीस उपायु्क्त विजयकुमार मगर यांनी पोलीस दलाची प्रतिमा मलीन केल्याप्रकरणी निलंबनाचे आदेश दिले आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, शहरात आतापर्यंत गुंडाकडून असे कृत्य केले जात होतो. आता मात्र पोलीसही गुंडाप्रमाणे तलवाही हातात घेताना दिसून येत आहेत. त्यामुळे सामान्य पुणेकरांचे नेमकं रक्षण कोण करणार असा प्रश्न पुणेकरांना या घटनेवरून पडला आहे.