Pune Police News पुणे : पुणे शहरातील सर्व पोलीस ठाणे व गुन्हे शाखेच्या वतीने सोमवारी (ता.३) रात्री १० ते मंगळवार (ता.४) मध्यरात्री दोन या कालावधीत ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशन हि मोहीम राबविण्यात आली होती. या मोहीमे अंतर्गत एकाच दिवसांत तब्बल १ हजार ८८२ गुन्हेगारांची झाडाझडती करून १५८ जणांना अटक केली.(Pune Police News)
‘ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशन’ मिशन राबविले.
पुणे शहरात मोठ्या प्रमाणात गुंडगिरी वाढली आहे. कोयता गॅंगमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे पुण्याची सांस्कृतिक पुणे ही ओळख पुसून गुन्हेगारांचे पुणे अशी होऊ लागली होती. यामुळे पोलिसांनी ‘ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशन’ मिशन राबविले.(Pune Police News)
पुणे पोलिसांच्या ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशन मध्ये ४५५ हॉटेल, ढाबे व लॉज तपासण्यात आले. तसेच ८५ एस टी स्टँड, रेल्वे स्थानक, निर्जन ठिकाणे चेक करण्यात आली. पोलिसांकडून २८ ठिकाणी नाकाबंदी करुन ३२८२ संशयित वाहन चालकांना चेक करुन ४७५ जणांवर १ लाख २२ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली. तर वाहतुक शाखेकडून ११२९ संशयित वाहन चालकांना चेक करुन ४७६ जणांवर ४ लाख ८ हजार ६०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.(Pune Police News)
दरम्यान, पोलिसांनी एकाच दिवसांत १ हजार ८८२ गुन्हेगारांची धरपकड करण्यात आली. यातील ६३९ गुन्हेगार मूळ पत्यावर राहत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी बेकायदा शस्त्र बाळगणे, जुगार प्रतिबंध कायद्यान्वये कारवाई करुन १५९ जणांना अटक केली. तर कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान ११ आर्म अॅक्ट गुन्ह्यांमध्ये ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ४७ हजार ४०० रुपयांचे १० धारदार हत्यारे, १ पिस्टल, २ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.(Pune Police News)
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या आदेशानुसार पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त (पूर्व) प्रवीण पाटील, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम) रंजन कुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, पोलिस उपायुक्त (वाहतूक) विजयकुमार मगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे.(Pune Police News)