Pune Police | शिरूर, (पुणे) : किरकोळ कारणावरून अज्ञात दोघांनी पोलीस कर्मचाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जोशीवाडी परिसरात घडली आहे. मंगळवारी (ता. २७) रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.
पोलिस कॉन्स्टेबल दीपक नागरे शिरूर पोलीस ठाणे असे हल्ला झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या घटनेत ते गंभीर जखमी झाले असून, उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिस कॉन्स्टेबल दीपक नागरे हे सदर ठिकाणावरून चालत जात असताना, त्यावेळी दोन अज्ञात व्यक्ती मोटर सायकल ढकलत रोडने चालत जात दिसले. त्यावेळी त्यांनी नागरे यांना विचारले की पेट्रोल पंप कुठे आहे? पेट्रोल टाकायचे आहे. त्यावेळी त्यांनी सांगितले की, शिरूर गावामध्ये व हायवेवर पण पेट्रोल पंप आहे.
पोलिसांनी त्यांना विचारले की, तुम्ही मोटर सायकल ढकलत का चालले आहात. त्यावेळी त्यांनी तुम्ही कोण आहात? असे विचारले असता, त्यांना पोलीस आहे असे सांगितले. त्यावेळी त्यांनी पोलिसावर कोयत्या सारख्या धारदार हत्याराने वार करून पळून गेले.
अतिदक्षता विभागात उपचार सुरु…
दरम्यान, नगरे यांच्यावर शिरूर मधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या मानेवर पाठीमागील बाजूस वार झालेने खोलवर जखम झालेली आहे. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. शिरूर पोलीस स्टेशन कडील तपास पथकांमार्फत पळून गेलेल्या अज्ञात दोन हल्लेखोरांचा शोध घेण्याचे काम चालू आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Arrested | किराणा दुकानातील साहित्य चोरणाऱ्या अट्टल चोरट्याला रांजणगाव MIDC पोलीसांनी ठोकल्या बेड्या