पुणे : पिंपरी चिंचवड शहर परिसरात आपल्या पोटच्या १६ वर्षीय मुलाला वडिलांनीच १२ व्या मजल्यावरून खाली फेकून देऊन स्वतःहि उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील वाकड येथील पलाश सोसायटीमध्ये हि घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच वाकड पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे पलाश सोसायटीमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन याबाबत तपास सुरु केला आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. बाप-लेक दोघेही मनोरुग्ण असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.