पुणे Pune – खेड तालुक्यातून संतापजनक घटना समोर आली आहे. शौचालयास गेलेल्या चार वर्षीय चिमुकलीवर एका नराधामाने बलात्कार केला आहे. (Pune) येथील वराळे येथे हा प्रकार घडला आहे. उत्तरप्रदेशच्या नराधमाने हे कृत्य केले आहे. (Pune)
म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याप्रकरणी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात पिडीत मुलीच्या आईने फिर्याद दिली. पोलीसांनी या नराधमास अटक केली आहे. सचिदानंद राजेंद्र विश्वकर्मा ( सध्या रा. वराळे, ता. खेड, मूळ रा. उत्तरप्रदेश ) असे आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवार रोजी चार वर्षीय पीडीत मुलगी शौचालयास गेली होती. त्यावेळी आरोपी सचिदानंद हा मुलीच्या पाठीमागे गेला व त्याने तिच्यावर अत्याचार केले. या घटनेनंतर परिसरात संंतापाची लाट उसळली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News | बुधवार पेठेतील ‘त्या गल्लीत’ जाणे पडले महागात ! तिघांनी मारहाण करुन लुबाडले…
Pune News : पोलिस कर्मचार्याला जमावाकडून लाथा बुक्क्यांनी मारहाण ; जुन्नर तालुक्यातील घटना…