Pune News : पुणे : ड्रग्ज तस्कर ललित पाटील याच्या पोलीस कोठडीची मुदत आज पूर्ण झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याला अंधेरी न्यायालयात हजर केले. या वेळी ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील याने नाशिकमध्ये ड्रग्सचा कारखाना कोणाच्या सांगण्यावरून टाकला? त्यासाठी कोणाची मदत झाली? या बाबींचा खुलासा मुंबई पोलिसांनी अंधेरी न्यायालयात केल्यानंतर अनेक धक्कादायक सत्य उघडकीला आली आहेत. त्यानंतर ललित पाटील याच्यासह चौघांना २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
धक्कादायक माहिती उघड झाल्याने शोधकार्याला वेग
नाशिकमधील ड्रग्ज कारखान्याची जागा एमआयडीसीने कांबळे या व्यक्तीच्या नावे लिजवर दिली आहे. हा कारखाना भूषण पाटील याने चालवण्यासाठी घेतला होता. (Pune News) कांबळे या व्यक्तीने यादव या व्यक्तीला कारखाना चालवायला दिला होता. भूषण पाटील याने यादवकडून कारखाना चालवण्यास घेतला. तो यादव यांना गुगल पे या माध्यमातून भाड्याची रक्कम देत होता… अशी माहिती चौकशीदरम्यान उघड झाल्याने शोधकार्याला वेग आला आहे.
ललित पाटील याची पोलीस कोठडी वाढवण्यासाठी अंधेरी महानगर दंडाधिकारी कोर्टात मुंबई पोलिसांनी अर्ज केला होचा. त्यात ललित पाटील, सचिन वाघ, शिवाजी शिंदे आणि रोहित चौधरी या सर्वांची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी केली. सरकारी वकिलांनी सांगितले की, मोठ्या प्रमाणावर ड्रग्सचा साठा जप्त करण्यात आला आहे. तपासात सचिन वाघ याने सांगितले की, त्याने एमडी ड्रग्सच्या साठ्याची विल्हेवाट लावली आहे. (Pune News) ललित पाटील यांच्या सांगण्यानुसार त्याने हे काम केले. परंतु सचिन वाघ याने ड्रग्सची खरंच विल्हेवाट लावली आहे की अजून कुठे लपवून ठेवला आहे, हा तपास करायचा आहे.
दरम्यान, भूषण पाटील हा ललित पाटील याच्या सांगण्यावरून ड्रग्स व्यवसाय चालवत होता. या दोघांची समोरासमोर चौकशी करायची आहे. (Pune News) त्यामुळे आरोपींच्या पोलीस कोठडीच वाढ करण्याबाबत न्यायालयात मांडण्यात आले. त्यानुसार २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : रुग्णालयात जाण्यासाठी ललित पाटील करत होता नाटक; २०२० मधील धक्कादायक व्हिडिओ समोर…
Pune News : वीज चोरी करणे पडले महागात ; महावितरणकडून २ कोटी ४५ लाख रुपयांची दंडात्मक कारवाई..