Pune News : पुणे : कोयता दुसऱ्याला विकण्यावरुन झालेल्या भांडणात दोघांनी एकमेकांवर वार केल्याची धक्कादायक घटना मार्केटयार्ड परिसरात नुकतीच घडली आहे. या घटनेत दोघेही जखमी झाले असून दोघांनी पोलिसांकडे एकमेकांविरुद्ध तक्रारी दिल्या असून पोलिसांनी दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत. हि घटना गुरुवारी (ता. २९) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे. (Pune News)
मिळालेल्या माहितीनुसार, ३७ वर्षाच्या पतीचे नवी पेठेत सलून आहे. ते पत्नी व ७ वर्षाच्या मुलासह राहतात. त्यांच्याकडे चार दिवसांपूर्वी एक कुलकर्णी या नावाचे गृहस्थ आले होते. त्यांनी झाडे कापण्यासाठी कोयता किंवा कैची विकत मागितली. त्यांनी विकण्यास नकार दिला. पत्नीला घरात कोयता दिसल्याने तिने कोयता विकून टाका असे सांगितले. (Pune News)
पतीने कोणी कोयत्याचा गैरवापर केल्यास आपणास त्रास होईल, असे सांगितले. त्यावर पत्नीने तुम्हाला घरात भंगार ठेवायला का आवडते. पैसे मिळत असतील तर तुम्ही कोयता का विकत नाही, असे म्हणून वाद घातला. तिला समजावून सांगत असताना तिने हातातील कोयता मारला. पतीला खाली पाडून पत्नीने हाताने व लाथेने मारहाण केली, असे पतीने फिर्यादीत म्हटले आहे. (Pune News)
दरम्यान, पती-पत्नींमध्ये वाद झाला. तो इतका वाढला की त्यांनी त्याच कोयत्याने एकमेकांवर वार केले. दोघेही जखमी झाले. दोघांनी पोलिसांकडे एकमेकांविरुद्ध तक्रारी केल्या. पोलिसांनी दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत.