Pune News : पुणे : पुण्यात गेल्या काही महिन्यांत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. शहरातील गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवली आहे. पोलिसांनी शहरातील ६ हजार ११६ सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेतली आहे. त्यापैकी ६०२ सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार देखील काही दिवसांपूर्वी स्वत: रस्त्यावर उतरले होते. आता हडपसर, तसेच वानवडी भागातील गुन्हेगारांना चाप बसविण्यासाठी पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी या भागातील ६५ गुंडांना पुणे शहर, जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. एकाचवेळी ६५ गुंडांना हद्दपार करण्यात आल्याने गुंडांना जरब बसणार असल्याची चर्चा होत आहे.
गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली
सध्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. शहरातील सर्व पोलीस चौक्यांमध्ये २४ तास पोलीस राहणार आहेत. (Pune News) कामात हलगर्जी करणाऱ्यांवर बडतर्फ आणि निलंबनाची कारवाई रितेश कुमार यांनी केली. तसेच शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयु्क्त संदीप कर्णिक यांनी गुंडांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
हडपसर, वानवडी भागातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्हेगारांची माहिती संकलित करण्यात आली. (Pune News) सराइतांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये (हद्दपार) कारवाई करण्यात आली. गुंडांना पुणे शहर, जिल्हा, तसेच पिंपरी-चिंचवड शहरातून हद्दपार करण्यात आले आहे.
ही कारवाई परिमंडळ पाचचे पोलीस उपायु्क्त विक्रांत देशमुख, सहायक आयुक्त शाहूराजे साळवे, अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण काळे, आश्लेषा माने आदींनी केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुणेकरांनो सावधान! शहरात डेंग्यूनंतर चिकुनगुन्याचाही शिरकाव; अशी घ्या काळजी!