Pune News : पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी असलेल्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी भोर तालुक्याच्या भाटघर धरण बॅक वॉटरच्या वेळवंड पांगारी खोऱ्यातील जयतपाड (ता. भोर) येथे पर्यटनासाठी आलेले बाप-लेक बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पिकनिकचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. ऐश्वर्या शिरीष धर्माधिकारी (वय १३ वर्षे) व शिरीष मनोहर धर्माधिकारी अशी बुडालेल्यांची नावे आहेत. यापैकी मुलगी ऐश्वर्या हिचा मृतदेह सापडला असून, वडिल शिरीष हे बेपत्ता आहेत. (Pune News)
पिकनिकचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
भाटघर धरणाच्या बॅकवॉटर परिसरातील रिसॉर्टवर हे कुटुंब पर्यटनासाठी आले होते. ते बॅक वॉटरमध्ये पोहण्याचा आनंद घेण्यासाठी गेले असता, बाप-लेकीचा बुडून मृत्यू झाला. घटनास्थळावर उपस्थित असलेल्या पर्यटकांनी मुलीला तत्काळ पाण्याबाहेर काढले. तिला दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. वडिलांचा मृतदेह शोधण्यासाठी शोधमोहिम राबवूनही मृतदेह सापडला नव्हता. रात्री अंधार झाल्याने शोधमोहिम थांबवण्यात आली होती. सकाळी वडिलांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. (Pune News)
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिरीष मनोहर धर्माधिकारी हे कुटुंबियांसह पर्यटनासाठी आले होते. त्यांच्यासोबत अन्य काहीजण होते. हे सर्वजण दुपारी ४ च्या सुमारास सिमा फार्म पाठीमागे असणारे भाटघर धरणाचे बॅकवॉटर पाहण्यासाठी गेले. शिरीष हे बेबी पूल पाहण्यासाठी गेले. काही वेळाने त्यांनी मुलगी ऐश्वर्या हिला देखील बोलावून घेतले. दोघेही पाच ते सहा मिनिट खोल पाण्यात पोहून आनंद घेत होते. काही वेळातच या आनंदाला गालबोट लागले. दोघेही खोल पाण्यात बुडाले. (Pune News)
या दोघांना वाचविण्यासाठी उपस्थितांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. ऐश्वर्याला पाण्याबाहेर काढले. मात्र, ती बेशुद्धावस्थएत होती. त्यानंतर तिला सरकारी दवाखाना भोर येथे दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी ऐश्वर्याला मृत घोषीत केले. या घटनेचा अधिक तपास भोर पोलीस करत आहेत. (Pune News)