Pune News : पुणे : मुलगा न झाल्याने रिद्धी व सिद्धी या दोन जुळ्या बहिणींचा खून केल्याची धक्कादायक घटना हडपसर परिसरात सन २०१९ -२० या कालावधीत घडली आहे. न्यायालयाने याप्रकरणी वडिलांसह चौघांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश हडपसर पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार वडिलांसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल
रिद्धी व सिद्धी अतुल सूर्यवंशी अशी खून झालेल्या जुळ्या बहिणींची नावे आहेत. (Pune News) तर त्यांचे वडील अतुल बाबासाहेब सूर्यवंशी, आजोबा बाबासाहेब, आजी जयश्री, काका अमोल बाबासाहेब सूर्यवंशी अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी श्रीकृष्णा प्रताप लोभे (वय ३५, रा. साई संस्कृती सोसायटी, बायफ रस्ता, वाघोली) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रीकृष्णा लोभे यांची बहीण उर्मिला यांचा अतुल याच्याशी सन २०१८ मध्येविवाह झाला होता. विवाहानंतर मुलगा हवा. (Pune News) मूल गोरे हवे, असे आरोपींनी उर्मिलाला सांगितले. मात्र उर्मिला गर्भवती झाल्यानंतर त्यांना रिद्धी आणि सिद्धी दोन जुळ्या मुली झाल्या.
मुलगा न झाल्याने आरोपींनी २६ नोव्हेंबर २०१९ रोजी सिद्धीला बाहेरील दूध आणून पाजले. दूध पाजल्यानंतर ती अत्यवस्थ झाली. आणि तिचा रुग्णालयात मृत्यू झाला. (Pune News) त्यानंतर आरोपींनी ६ फेब्रुवारी २०२० रोजी रिद्धीलाहे बाहेरील दूध पाजले. आणि यामध्ये रिद्धीचाही मृत्यू झाला.
दरम्यान, रिद्धी आणि सिद्धी यांचा मृत्यू बाहेरील दूध पाजून झाला. दूधात काहीतरी मिसळल्याचा संशय उर्मिलाचा भाऊ लोभे यांना होता. त्यानंतर लोभे यांनी न्यायालयात खासगी फौजदारी दावा दाखल केला होता.
न्यायालयाने याप्रकरणी खून, कट रचणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश हडपसर पोलिसांना नुकतेच दिले. त्यानुसार रिद्धी आणि सिद्धी या जुळ्या बहिणींचा खूनाच्या गुन्हात वडिलांसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune News) पुढील तपास हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे संदीप शिवले करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुणेकरांसाठी खुशखबर! खडकवासला ते हडपसर मेट्रोविस्ताराला मंजुरी मिळणार; कसा आहे आराखडा?
Pune News : आता पुणेकरांना मिळणार पुराचा अॅलर्ट…; कशी असेल नवी यंत्रणा?