Pune News : पुणे : प्रवासादरम्यान स्टोव्ह, गॅस सिलिंडर, ज्वलनशील रसायने, फटाके, ॲसिड घेऊन प्रवास करण्यास सक्त मनाई असते. तरीही काही प्रवासी आपल्या सोबत असे पदार्थ घेऊन चोरून प्रवास करतात. फटाके घेऊन रेल्वेतून प्रवास करणे प्रवाशाला महागात पडले आहे. या प्रवाशाला रेल्वे सुरक्षा दलाच्या श्वान पथकाने अचूक हेरले. रेल्वे कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रवाशावर गुन्हा दाखल
परळी-मिरज पॅसेंजर (११४११) ही रेल्वे मिरज स्थानकावर पोहोचल्यावर रेल्वे सुरक्षा दलाचे सहायक निरीक्षक राकेश कांबळे हे श्वान पथकातील श्वान चेतक आणि खंड्या यांच्यासोबत प्रवाशांची तपासणी करीत होते. (Pune News) यावेळी फलाटावर उतरलेल्या प्रवाशाच्या कापडी पिशवीचा वास आल्यावर श्वानाने भुंकण्यास सुरुवात केली. त्याच्या हँडलर जवानाला काही संशयास्पद वस्तू असल्याचा इशारा श्वानाने केला. आरपीएफने संबंधित प्रवाशाची पिशवी तपासली असता, त्यात फटाके आढळून आले.
दरम्यान, याप्रकरणी संबंधित प्रवाशाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, रेल्वे कायद्याच्या विभिन्न कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune News) ही घटना मंगळवारी (ता. १९) मिरज स्थानकावर घडली. प्रवाशांनी प्रवासादरम्यान ज्वलनशील पदार्थ घेऊन प्रवास करू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पतीच्या मारहाणीला कंटाळून बिबवेवाडीत नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
Pune News : मौजमजेसाठी हडपसर परिसरात दुचाकी चोरी; वाहन चोरी पथकाने आवळल्या मुसक्या