भोर, (पुणे) : तरुणाने तरुणीची छेड काढत आपल्या साथीदारांसह तिच्या नातेवाईकाला बेदम मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेनेनंतर पीडित तरुणीने फिनाइल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून या प्रकरणी भोर पोलिसांनी १० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.हा प्रकार ३१ मे ते १७ जून या कालावधीत घडला आहे.(Pune News )
अक्षय शिंदे आणि त्याचे साथीदार रोहित शिंदे, बाबू शिंदे, प्रतीक दुधाळ, सोन्या बांदल, मयूर साळेकर, संकेत शिर्के, समीर जाधव, आदिल जमादार, चिक्या शिवतरे अशा एकूण १० जणांवर भोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात तरुणी पोलिसात फिर्याद दिली आहे. Pune News )
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी अक्षय याने ३१ मे रोजी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणी तिच्या घरी असताना घरामध्ये जबरदस्तीने घुसून तिच्याशी गैरवर्तन केले. त्यावेळी तरुणीने प्रतिकार केला असता आरोपी याने फिर्यादीस हाताने मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केलीBhor Pune .रोपी अक्षय याने तिचा मोटार सायकलवरून पाठलाग केला. या सर्व प्रकाराला कंटाळून तरुणीने १७ जून रोजी राहत्या घरात बाटलीत असलेले फिनाइल पित आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. (Pune News)
दरम्यान, तरुणीला त्रास होऊ लागल्याने शेजारच्या महिलेने तिला खाजगी रुग्णालयात नेलं. आरोपींनी पीडितेचा नातेवाईक असलेल्या ओंकार आवाळे यालाही आपल्या साथीदारांच्या मदतीने मारहाण केली. याप्रकरणी भोर पोलीस स्टेशनचे कर्मचारी पुढील तपास करीत आहेत(Pune News )