Pune News पुणे : महिलेला निर्जनस्थळी नेऊन तिच्या प्रियकरासह चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घोडेगाव (ता. आंबेगाव) गावाजवळ घडली आहे. (Pune News) या घटनेने संपूर्ण पुणे जिल्हा हादरला आहे. (Pune News)
घोडेगाव पोलिसांनी एकाला ठोकल्या बेड्या
याप्रकरणी पिडीत महिलेने घोडेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसर आकाश चंद्रकांत भालेराव, संदेश अशोक जाधव, संजय आणि आदेश अशोक जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपीची नावे आहे. तर घोडेगाव पोलिसांनी तत्काळ पिडीत महिलेचा प्रियकर आकाश भालेराव याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिला आणि आकाश चंद्रकांत भालेराव या दोघांचे प्रेमसंबंध आहेत. शुक्रवार (दि.२३) रोजी ते दोघे मोटारसायकल वरून चालेले होते. त्यावेळी मोटरसायकल वरून संदेश अशोक जाधव, संजय आणि आदेश अशोक जाधव हे तिघे आले.
दरम्यान, आरोपींनी महिलेला घोडेगाव (ता. आंबेगाव) गावाजवळील निर्जनस्थळी नेले. आणि पिडीतेच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने अंगावरील कपडे काढून आळीपाळीने सामूहिकरीत्या बलात्कार केला. “याबाबत जर कोणाला सांगितले तर तुला जिवंत सोडणार नाही”, अशी धमकीही आरोपींनी दिली.
त्यानंतर पिडीत महिलेने तात्काळ घोडेगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. आणि घडलेल्या प्रकार पोलिसांना सांगितला. याप्रकरणी पिडीत महिलेनी दिलेल्या फिर्यादीनुसार घोडेगाव पोलिस ठाण्यात चार जणांच्या विरोधात सामुहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घोडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी पिडीत महिलेचा प्रियकर आकाश चंद्रकांत भालेराव याला ताब्यात घेतले आहे. तर पोलीस उर्वरित तीन आरोपीचा शोध घेत आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांचे पथक करीत आहेत.