Pune News : पुणे जिल्हा न्यायालयातील लिफ्ट वीजप्रवाह खंडित झाल्याने बंद पडली होती. त्यामुळे सरकारी वकील तिसऱ्या मजल्यावरच्या न्यायदान कक्षात उपस्थित राहू शकले नाहीत. मग न्यायाधीशांनी खटल्याची सुनावणी थेट तहकूब केली आहे. आणि या खटल्याच्या पुढील सुनावणीची उद्या गुरुवारी (दि.६) होणार असल्याचे सांगितले आहे.(Pune News)
न्यायालयातील लिफ्ट वीजप्रवाह खंडित झाल्याने बंद पडली
मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयातील सत्र न्यायाधीश एच. बी. शिरसाळकर यांच्या न्यायालयात भाजपचे एक नगरसेवक आणि इतर चार जणांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी भादंवि ३५३ अन्वये हवेली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या खटल्याची सत्र न्यायाधीश शिरसाळकर यांच्या कोर्टासमोर शुक्रवारी (दि.३० जून) सुनावणी होती.(Pune News)
या खटल्यातील फिर्यादी पोलिस हवालदार अमित संपत पवार हे स्वत: फिर्यादी म्हणून साक्ष देण्यासाठी साक्षीदार म्हणून न्यायालयाच्या कक्षात उपस्थित होते. संबंधित न्यायालयीन कक्ष शिवाजीनगर पुणे जिल्हा न्यायालयातील नवीन इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर आहे. आणि या खटल्याची येथे सुनावणी होणार होती.(Pune News)
शुक्रवारी सकाळच्या सत्रात न्यायालयाच्या आवारातील वीज प्रवाह खंडित झाल्याने नवीन इमारतीतील सर्व लिफ्ट बंद होत्या. या तांत्रिक कारणामुळे सरकार पक्षाचे संबंधित सरकारी वकील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या न्यायालयीन कक्षात उपस्थित राहू शकले नाहीत. म्हणून न्यायालयाने फिर्यादी असलेले पोलिस अंमलदार स्वत: साक्ष देण्यासाठी न्यायालयात हजर असून देखील त्यांची साक्ष नोंदवून घेऊ शकले नाहीत. न्यायाधीशांना नाईलाजाने त्या दिवशीची सुनावणी तहकूब करावी लागली.(Pune News)
दरम्यान, आरोपी किंवा साक्षीदार न्यायालयात हजर न राहिल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याचे आजवर आपण पाहिले आहे. मात्र वीजप्रवाह खंडित झाल्याने न्यायालयातील लिफ्ट बंद पडली आणि सरकारी वकील तिसऱ्या मजल्यावरच्या न्यायदान कक्षात उपस्थित राहू न शकल्याने सुनावणीच तहकूब करावी लागल्याचा पहिल्यांदाच हा प्रकार पाहायला मिळाला आहे.(Pune News)