Pune News : शहरातील ऐतिहासिक येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये होणारे वाद, भांडण-तंटे, हाणामारी हे प्रकार नवे नाहीत. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये या प्रकारांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. गेल्या आठ दिवसांत येरवडा करागृहात हाणामारीचा प्रकार तिसऱ्यांदा घडला आहे. या प्रकारामुळे कारागृहातील कैद्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकारामुळे तुरुंग प्रशासनावरही प्रश्न उपस्थित केले जात आहे.(Pune News)
गेल्या आठ दिवसांत येरवडा करागृहात हाणामारीचा प्रकार तिसऱ्यांदा घडला आहे.
राज्यातील सर्वांत जुने आणि मोठे कारागृह, म्हणून येरवडा कारागृहाचा उल्लेख होतो. हे कारागृह नेहमी कैद्यांनी गजबजलेले असते. याठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त कैदी ठेवण्यात आले आहेत. जन्मठेप किंवा इतर शिक्षेचे आरोपीही कारागृहात आहेत. खून प्रकरणात शिक्षा झालेल्या कैद्यांची संख्या कारागृहात मोठी आहे. त्यानंतर चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींची संख्या आहे.(Pune News) आता येरवडा जेलमध्ये कैद्यांमध्ये पुन्हा राडा झाला आहे. प्रकाश विठ्ठल रेणुसे, विकास बाळासाहेब कांबळे, वैभव थिटे, तेजस बाळासाहेब बच्छाव यांच्यांमध्ये हाणामारी झाली आहे. जेलमध्ये कैद्यांकडून झालेल्या हाणामारीत एक कैदी गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.(Pune News)
दरम्यान, काही दिवसांपूर्वी आळंदी येथील वाद प्रकरणातील आरोपींमध्ये हाणामारी झाली होती. ही हाणामारी प्लास्टिक बकेट, भाजी वाढण्याचे वरगाळे यांचा वापर करुन झाली होती. यावेळी काही जण जखमी झाले होते. त्यानंतर पुण्यातील गालफाडे टोळीतील कैद्यांनी हाणामारी केली होती. यावेळी १६ कैदी आपापसांत भिडले होते. ही हाणामारी पूर्ववैमनस्यातून झाली होती. यावेळी दगड, पत्रा घेऊन एकमेकांना मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आठ दिवसांत येरवड्यात तिसऱ्यांदा कैद्यांमध्ये हाणामारी झाली आहे. यामुळे कैद्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.(Pune News)
कारागृहातील कैद्यांसाठी एक नवीन सुविधा सुरु करण्यात आली आहे. कैद्यांना महिन्यातून तीन वेळा नातेवाईकांशी संपर्क साधता येणार आहे. त्यासाठी त्यांना फोनची सुविधा दिली आहे. मात्र, हाणामारीच्या वाढत्या घटना या कैद्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतातच, शिवाय तुरुंग प्रशासनावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.(Pune News)