Pune News : पुणे : पुण्यात एक धक्कादायक घटना घडली. यात एका व्यक्तीला त्याच्या आईचा मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळाली खरी पण ती नेण्यासाठी चालक वेळेत उपलब्ध होऊ शकला नाही. त्यामुळे त्याला त्याच्या आईचा मृतदेह रिक्षातून नेण्याची वेळ आली. त्याने हा मृतदेह तब्बल सहा तास रिक्षाने नेल्याचा प्रकार समोर आला. (Pune news)
पुण्यातील अक्षय चाबुकस्वार यांच्या आईचं पटेल रुग्णालयात निधन झाले. तेव्हा मृतदेह नेण्यासाठी रुग्णालयात रुग्णवाहिका उपलब्ध होती. मात्र, ती चालवायला चालक नव्हता. त्यामुळे त्यांचा मृतदेह शवगृहात ठेवावा यासाठी त्यांनी रिक्षा करून आईचा मृतदेह घेऊन जात जवळ असलेल्या रुग्णालयात नेण्याचं ठरवलं. (Pune news)
त्यामुळे रिक्षातून त्यांनी मृतदेह आणला. (Pune news) पण, तांत्रिक कारणाने शवागृह बंद होते. त्यामुळे अखेर ससून रुग्णालयात त्यांना मृतदेह हलवावा लागला. मृतदेह सकाळ पर्यंत शवागृहात ठेवण्यासाठी चाबुकस्वार कुटुंबाला जवळपास सहा तास रिक्षामध्ये आईचा मृतदेह घेऊन फिरावे लागले. (Pune news)
आरोग्य यंत्रणांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर..
पुण्यातील या प्रकाराने आरोग्य यंत्रणांचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. (Pune news)