Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : धक्कादायक ! एकतर्फी प्रेमातून कारागृह शिपाई महिलेला पेटवण्याचा प्रयत्न; तुरुंग अधिकाऱ्याला अटक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 16 August 2023, 17:12

Pune News : येरवडा : पुण्यात स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. एका निलंबित वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्याने कारागृह महिला कर्मचाऱ्याच्या घरी जाऊन, महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, महिलेने अधिकाऱ्याला जोरदार प्रतिकार करत स्वतःला बेडरूममध्ये कोंडून घेतल्याने पुढील अनर्थ टळला. प्रेम संबंध ठेवण्यास नकार दिला तसेच बलात्काराचा गुन्हा मागे घेत नसल्याने अधिकाऱ्याने हे नीच कृत्य केल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी तुरुंग अधिकाऱ्याला अटक केली आहे. Pune News

येरवडा पोलिसांनी तुरुंग अधिकाऱ्याला अटक केली

योगेश भास्करराव पाटील (वय ५२, रा. जेलर बंगला, जेल वसाहत, कोल्हापूर) असे अटक केलेल्या वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी ३९ वर्षांच्या कारागृह महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. Pune News

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या कारागृह शिपाई म्हणून काम करत असून आरोपी योगेश पाटील याच्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल आहे. कोल्हापूर कारागृहात कर्तव्यावर असताना आरोपी पाटील आणि फिर्यादी महिलेचे ओळखीतून प्रेम संबंध निर्माण झाले होते. आरोपीने महिलेवर अनैसर्गिक अत्याचार आणि बलात्कार केल्याने महिलेने कोल्हापूरमध्ये वरिष्ठ तुरुंग अधिकारी पाटील याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याने राज्यात खळबळ उडाली होती. याप्रकरणी कारागृह विभागाने पाटील याला निलंबित करण्याची कारवाई केली होती.  Pune News

 

दरम्यान, पाटील हा पीडित फिर्यादीला गेल्या काही दिवसांपासूंन वारंवार फोन करून त्रास देत होता. तसेच गुन्हा मागे घेण्यासाठी जीवे मारण्याची धमकी देत होता. दरम्यान, त्याने पीडितेला फोन करत तुझ्याशिवाय जगू शकत नाही, अशी बतावणी देखील केली. दरम्यान, फिर्यादी या सोमवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घरी येत असताना त्याने तिला रस्त्यात गाठले. माझ्यासोबत चल, असे सांगत फिर्यादीच्या घरी आला. तो घरातील वॉशिंग मशीन घेऊन गेला.

दरम्यान, हा माथेपीरू पुन्हा पिडीतेच्या घरी आला. येताना प्लॅस्टिकच्या बाटलीत पेट्रोल घेऊन येत पीडितेला धमकावले. जर तू माझी झाली नाही तर मी तुला कोणाचीच होऊ देणार नाही, असे म्हणत त्याने तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पीडितेने त्याला धक्का देऊन आज खोलीत जाऊन लपली. तसेच इतरांची मदत मागितली. Pune News

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी येत आरोपी पाटील याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19
Next Post

Rajgad Fort News : राजगड किल्ल्यावर रात्री मुक्कामासाठी थांबलेल्या पर्यटकाचा टाक्यात पडून मृत्यू..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.