Pune News : पुणे : पुणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीमध्ये वाढ झाली आहे. शहरात विविध गुन्हे घडत आहेत. अशातच आज एक चोरीचा धक्कादायक प्रकार शहरातून समोर आला आहे. कोंढवा येथील इंडसइंड बँकेतून चोरट्यांनी दिवसाढवळ्या चोरी केली आहे. बँकेत पैसे भरण्यासाठी आलेल्या व्यक्तीचे तब्बल २ लाख रुपये घेऊन चोरटे पसार झाले आहेत. आज सकाळी 11च्या सुमारास हा प्रकार घडला आहे. दरम्यान चोरीचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. (shocking! Daylight robbery at IndusInd Bank in Pune; The thrill of theft caught on CCTV)
कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
या प्रकरणी अक्षय गोटे (वय 38 वर्षे, धंदा रियल इस्टेट, रा. सी 308 अलकसा सोसायटी महमदवाडी) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रियल इस्टेटचा व्यवसाय करणारे तक्रारदार अक्षय गोटे हे कमिशन मिळालेले 2 लाख रुपये खात्यात भरण्यासाठी कोंढव्यातील इंडसइंड बँकते आले होते. (Pune News) सकाळी पावणे अकरा वाजता ते चलन स्लीप भरत असताना अज्ञात चोरटा त्यांच्या जवळ आला. मी बँकेतील कर्मचारी आहे, आम्हाला एटीएममध्ये पैसे भरावे लागणार आहेत, तुमची स्लिप लवकर भरा असे चोरट्याने अक्षय यांना सांगितले. बँकेतील कर्मचारी आहे, असा भास झाल्याने अक्षय यांनी चोरट्याच्या हातात पैसे दिले व स्वत: स्लीप भरत बसले.
दरम्यान, तक्रारदार याने स्लीप भरल्यावर जेव्हा तो कॅश काऊंटरवर गेला तेव्हा त्याला तो माणूस दिसला नाही. (Pune News) चोर ती रक्कम घेऊन तो लंपास झाला. चोरीचा हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुण्यात निवृत्त कर्नलही अडकला टास्क फ्रॉडच्या जाळ्यात; तब्बल अडीच कोटीला गंडा
Pune News : ओतूर पोलिसांची कामगिरी..! साडेचार लाखांचे गहाळ झालेले १९ मोबाईल मिळाले नागरिकांना परत..