Pune News : शिरूर : कवठे येमाई (ता.शिरूर) येथील गावठी दारू ( हातभट्टी ) व अवैध ताडीवर शिरूर पोलिसांनी छापा टाकून धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल रुपयांचा मुद्देम्माल नष्ट केला आहे. तर दोघांवर शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. (Pune News)
सूरज लालासाहेब झेंडे (कवठे येमाई ता. शिरूर जि. पुणे) व सागर गडगुळ (रा. मुंजाळवाडी कवठे येमाई ता. शिरूर जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
१ लाखाहून अधिक रुपयांचा मुद्देमाल साहित्यासह जप्त…
शिरूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, कवठे येमाई येथे सूरज झेंडे व सागर गडगुळ हे अवैध दारू व ताडी तयार होऊन विक्री करीत आहेत. अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे पथक तयार केले. (Pune News)
सदर पथकाने कवठे येमाई येथे छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी दारू तयार करण्यासाठी लागणारे १४ प्लास्टिक बॅरल मधिल २८०० लिटर कच्चे रसायन, ३५ लिटर तयार दारू, ५ लिटर ताडी असा १ लाखाहून अधिक रुपयांचा मुद्देमाल साहित्यासह जप्त करून नष्ट केला आहे. (Pune News)
याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिरूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर करीत आहेत.
दरम्यान, शिरूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी पदभार स्वीकारताच शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाईचा बगाडा उगारला आहे. या कारवायांमुळे अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहेत. तर वारंवार होत असलेल्या कारवायांमुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. (Pune News)
हि कारवाई शिरूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलिस उपनिरीक्षक सुनिल उगले, पोलिस अमंलदार धनंजय थेउरकर, विशाल पालवे, दिपक पवार, सुरेश नागलोत, सोनू तावरे यांच्या पथकाने केली आहे. (Pune News)
याबाबत बोलताना पोलिस निरीक्षक संजय जगताप म्हणाले कि, शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाईचे सत्र सुरूच राहणार असून यासाठी विशेष पथक तयार करणार आहे. अवैध दारू व ताडी धंदे या बाबतचे गुन्हे वारंवार करणाऱ्या गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाया तसेच तडीपार किंवा हद्दपारी सारख्या कडक कारवाया केल्या जाणार आहेत.