Pune News : पुणे : आजच्या विज्ञान युगात देखील जादू-टोण्याच्या नावाने सुशिक्षितांची फसवणूक होण्याचे प्रकार सुरूच आहेत. घरावर, नोकरीवर आलेली विघ्ने दूर करण्यासाठी ज्योतिषाची मदत घेऊन फसवणूक झाल्याच्या तक्रारी फक्त ग्रामीण भागातच नाही, तर शहरी भागातही दाखल केल्या जात आहेत. तसाच काहीसा प्रकार एका तरुण सॉफ्टवेअर इंजिनिअरबाबत घडला आहे. घरावर विघ्न आले आहे. ते दूर करण्यासाठी विविध धार्मिक विधी व जादूटोणा करावा लागेल, असे सांगून इंजिनिअरच्या पत्नीच्या नातेवाईकानेच ज्योतिषाच्या मदतीने २० लाख रुपये तसेच २५ तोळे सोने घेऊन पळ काढला आहे. हा प्रकार मार्च २०२१ ते ऑगस्ट २०२१ दरम्यान घडला.
विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या फिर्यादीच्या पत्नीचा नातेवाईक असलेला विजय जाधव याचे फिर्यादीच्या घरात येणे-जाणे होते. फिर्यादीच्या आर्थिक तसेच कौटुंबिक परिस्थितीची जाधव याला माहिती होती. त्यामुळे घरातील पैसे व दागिने काढून घेण्याच्या हेतूने त्याने शक्कल लढवली. (Pune News ) तुमच्या घरात अनेक समस्या सुरू आहेत. या समस्या दूर करण्यासाठी धार्मिक विधी करावे लागतील, असे त्याने फिर्यादीला पटवून सांगितले.
आरोपीने अभिषेक कुलकर्णी (वय ३५) व सदाशिव फोडे (वय ३७, रा. इंदापूर) यांच्याशी संगनमत केले. फिर्यादी यांना विश्वासात घेऊन वेळोवेळी धार्मिक विधी व जादूटोणा करण्यासाठी त्यांच्याकडून पैसे घेतले. पूजा करण्यासाठी त्यांनी गव्हाच्या कणकेचा पुतळा बनवून त्याला दागिने घालण्यास सांगितले. (Pune News ) कणकेचा पुतळा पूजेसाठी मठात घेऊन जात असल्याचे सांगत दागिन्यासह पुतळा घेऊन पसार झाले. त्यानंतर ते परत आलेच नाही. त्यानंतर लॉकडाऊन सुरु झाल्याने नंतर पैसे, दागिने देतो, असे सांगून टाळाटाळ करत होते. शेवटी या सॉफ्टवेअर इंजिनिअरने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली आहे.
याबाबत विश्रांतवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी धानोरी येथील एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने (वय ३३) विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १८९/२३) दिली आहे.(Pune News ) फिर्यादीवरून अभिषेक कुलकर्णी (वय ३५), विजय गोविंद जाधव (वय ३०, रा. इंदापूर), सदाशिव फोडे (वय ३७, रा. इंदापूर) यांच्यावर नरबळी व इतर अमानुष अनिष्ट आणि अघोरी कृत्य प्रतिबंध निर्मुलन व काळी जादू अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : महाराष्ट्राचा शैक्षणिक दर्जा घसरला; थेट सातव्या श्रेणीपर्यंत घसरण