Pune News : धनकवडी, (पुणे) कंपनीतील कामे उरुकून रिक्षातून घरी निघालेल्या एका अभियंत्यास रिक्षा चालक व त्याच्या दोन साथीदारांनी मारहाण करीत तब्बल १ लाख ६८ हजार रुपये काढून घेतल्याची घटना घडली आहे. गुरुवारी (ता. २०) मध्यरात्री खडी मशिन चौकात घडली आहे. (Pune News)
याप्रकरणी नंदकुमार वाघ (वय ४०,रा. गायमुख चौक, आंबेगाव बु) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात रिक्षाचालक व त्याच्या दोन साथीदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Pune News)
१ लाख ६८ हजार रुपये काढून घेतल्याची घटना…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार नंदकुमार वाघ हे पिसोळे येथे डिझायनर इंजिनिअर म्हणून एका कंपनीत काम करतात. त्यांचा दररोजच्या प्रवास रिक्षातून होत असतो. गुरुवारी (ता. २०) रात्री सव्वा बारा च्या सुमारास खडी मशिन चौकातून रिक्षाने कात्रज बस थांबा येथे उतरले होते. तेथे आंबेगावला जाण्यासाठी रिक्षाची वाट पहात थांबले असता एक व्यक्ती त्यांच्या जवळ आला. त्याने रिक्षातून आंबेगाव येथे सोडतो असे सांगून बस थांब्याच्या पुढील बाजूस पार्क असलेल्या रिक्षात नेले. (Pune News)
त्या ठिकाणी अगोदरच दोन व्यक्ती रिक्षामध्ये बसलेल्या होत्या. रिक्षामध्ये तीघे ही आरोपी बसल्यावर त्यांनी आंबेगावकडे जात असताना रिक्षातच वाघ यांना मारहाण करण्यास सुरवात केली. त्यातील एकाने चेन, अंगठी आणि खिशातील जेवढे पैसे असतील तेवढे ते अन्यथा जीवे मारील अशी धमकी दिली. (Pune News)
वाघ यांनी विरोध करताच त्यांच्या गळ्यातील सोन्याचे चेन आणि अंगठी जबरदस्तीने काढून घेण्यात आली. यानंतर पुढे राजवीर हॉटेलसमोर रिक्षातून खाली उतरवत लॅपटॉप आणि चार्जर असलेली बॅग हिसकावून घेण्यात आली. यानंतर वाघ यांना ढकलून देऊन आरोपी पळून गेले. या घटनेने वाघ यांना मोठा धक्का बसल्याने त्यांनी तक्रार दिली नव्हती. मात्र कंपनीच्या मालकांनी धीर दिल्यानंतर तक्रार दाखल केली. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड करत आहे. (Pune News)