Pune News : पुणे : शहर आणि परिसरात भुरट्या चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. विश्रांतवाडी परिसरात बस स्टॉपवर थांबलेल्या प्रवाशाचा मोबाईल व खिशातील रोख रक्कम चोरुन नेणाऱ्या दोघांना येरवडा पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. आरोपींकडून मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही घटना ३१ ऑगस्ट रोजी गुंजन चौकातील बस स्टॉपवर घडली होती.
येरवडा पोलिसांची कामगिरी
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सोमेश सुभाष कुसाळे (वय २५, रा. टिंगरेनगर, पुणे), संतोष गरिबदास खंडागळे (वय ३१, रा. महाराष्ट्र हौसिंग सोसायटी, येरवडा) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींवर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune News) फिर्यादी गुंजन चौकातील बस स्टॉपवर थांबले होते. या वेळी दुचाकीवरुन आलेल्या दोन व्यक्तींनी त्यांचा मोबाईल आणि खिशातील १२०० रुपये जबरदस्तीने हिसकावले.
दरम्यान, गुन्ह्याचा तपास करत असताना, जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी विश्रांतवाडी परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार अमजद शेख व अनिल शिंदे यांना मिळाली. (Pune News) पोलिसांनी विश्रांतवाडी परिसरात आरोपींचा शोध घेऊन ताब्यात घेतले.
आरोपींकडे सखोल चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. (Pune News) आरोपींकडून दोन हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली ४० हजार रुपयांची दुचाकी असा एकूण ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुण्यात गावगुंडांची दहशत; अज्ञातांकडून मध्यरात्री ४ रिक्षांची जाळपोळ
Pune News : पुण्याचा श्रीमंत दगडूशेठ हलवाई बाप्पा बसणार यंदा अयोध्येतील प्रभू राम मंदिरात!