Pune News : मुंढव्यातील केशवनगर भागात आरोपी एका व्यावसायिकाच्या घरासमोर गोंधळ घालत होते. त्या वेळी व्यावसायिकाने जावळे आणि साथीदारांना हटकले होते. त्यानंतर जावळे आणि साथीदारांनी व्यावसायिकावर कोयत्याने वार करून त्याचा खून केला होता. या घटनेनंतर मुंढवा-केशवनगर भागातील रहिवाशांनी बंद पाळला होता. मुंढवा भागात दहशत माजवून एका व्यावसायिकाचा खून करणाऱ्या या कोयता गँगविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले आहेत. (Pune News)
केशवनगर भागात आरोपी एका व्यावसायिकाच्या घरासमोर गोंधळ घालत होते.
सागर अशोक जावळे (वय २२), आकाश अशोक जावळे (वय १९), साहील भीमाशंकर सुतार (वय १९), सनी विनायक चव्हाण (वय २५), नागनाथ उर्फ हरी विठ्ठल पाटील (वय २२), रोहीत दत्तात्रय घाडगे (वय २२, रा. सर्व, मांजरी) अशी कारवाई करण्यात आलेल्या गुंडांची नावे आहेत. आरोपी सागर जावळे याने साथीदारांशी संगमनत करून दहशत माजविली होती.(Pune News)
मुंढव्यातील केशवनगर भागात आरोपी एका व्यावसायिकाच्या घरासमोर गोंधळ घालत होते. व्यावसायिकाने जावळे आणि साथीदारांना हटकले असता, जावळे याने साथीदारांसह व्यावसायिकावर कोयत्याने वार करून त्याचा खून केला.(Pune News) या घटनेनंतर जावळे आणि साथीदारांविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी तयार केला होता.(Pune News)
अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्याकडे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. या प्रस्तावास पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मंजुरी दिली. सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. पोलीस आयुक्तांच्या आदेशाने आतापर्यंत शहरातील ३१ गुंड टोळ्यांविरुद्ध मोक्का कारवाई करण्यात आली आहे.(Pune News)