Pune News : लग्नास विरोध केल्यामुळे एका नातेवाईकानेच घरात घुसून मायलेकींवर कुर्हाडीने वार करून खून करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कात्रज परिसरात शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pune News)
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल.
प्रेमकुमार नारीया (रा. कोंढवा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर या हल्ल्यात
रेश्मा प्रेमबाबु वाल्मिकी (वय ३५) आणि त्यांची मुलगी ऋतुजा (वय १८, रा. संतोषनगर, कात्रज) या दोघी मायलेकी गंभीर जखमी झाल्या आहेत.(Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्मिकी कुटुंब मागील काही वर्षांपासून कात्रज येथे राहतात. तर फिर्यादी रेश्मा वाल्मिकी यांच्या बहिणीचा चुलत भाचा प्रेमकुमार नारीया हा जुन्या भांडणाच्या कारणावरुन घरी आला. तेव्हा घरात दोघी मायलेकी होत्या.(Pune News)
दरम्यान, फिर्यादी यांनी त्यांच्या लग्नास विरोध केला होता. या रागातून आरोपी प्रेमकुमार याने मुलगी ऋतुजा हिच्यावर कुर्हाडीने वार करण्यात सुरुवात केली. पहिला वार तिने हाताने अडविला. दुसरा वार तिच्या डोक्यावर करण्यात आला.(Pune News)
मुलगी ऋतुजाला वाचविण्यासाठी रेश्मा मध्ये धावल्या. त्यानंतर आरोपीने त्यांच्याही डोक्यात, पायावर आणि हातावर वार करुन गंभीर जखमी केले. या दोघींच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आजू बाजूचे लोक धावत आले.(Pune News)
गर्दी जमलेली पाहून आरोपीने तेथून पळ काढला. दोघींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे़.