Pune News पुणे : जुन्नर तालुक्यातील गेल्या महिन्यांत ४ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. या चारही बिबट्यांचा मृत्यू भुकेने तडफडून झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. अशी माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली. राज्यातील बिबट्यांच्या संख्येवर नजर टाकल्यास सर्वाधिक बिबटे याच परिसरात राहतात. त्यामुळे पर्यावरणाचे बिघडत चाललेले संतुलन आणि भुकबळींमुळे होणारे बिबट्यांचे मृत्यू चिंतेची बाब आहे.
मंचर आणि शिरुरमध्ये बिबट्यांचे मृत्यू
मंचर आणि शिरुरमध्ये बिबट्यांचे मृत्यू झाले आहेत. या भागात बिबट्यांचा सर्वाधिक अधिवास आहे. या भागातील बिबट्यांचे वयोमान १ ते १२ वर्षांपर्यंत आहे. शिकारीचा अभाव आणि कमी होत चाललेला अधिवास या दोन प्रमुख कारणांमुळे बिबट्यांचे मृत्यू होत असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली आहे.
मंचरमध्ये ५ आणि ८ मार्चला बिबट्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या शवविच्छेदनातून काही समान बाबी आढळून आल्या आहेत. या दोन्ही बिबट्यांनी तीन ते चार दिवस काहीच खाल्ले नव्हते, अशी माहिती मंचरच्या वनक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांनी दिली.
गेल्या दोन वर्षांत आम्ही या विभागात बिबटय़ांमधील संघर्ष पाहिला आहे. एखाद्या प्रदेशावरील वर्चस्वासाठी बिबटय़ांमध्ये संघर्ष होतो. गेल्या 2 वर्षांत हा संघर्ष प्रचंड प्रमाणात वाढला आहे. असे याआधी कधीही घडले नव्हते. यातून पर्यावरणाचे बिघडते संतुलन अधोरेखित होते, असे जुन्नर विभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune Crime News : धडाकेबाज कारवाई : तडीपार गुंडाला पोलिसांनी पाठलाग करुन पकडले!
Pune News : श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली पाहणी
पुणे जिल्ह्यातील या ठिकाणी आता वनप्रेमींना मिळणार बिबट्या सफारीचा आनंद