Pune News : पुणे : ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर, कस्टडीत असलेल्या ललित पाटील याची कसून चौकशी होत आहे. यावेळी अनेक धक्कादायक माहिती उघड होत आहे. ड्रग्सच्या काळ्या धंद्यातून महिन्याकाठी त्याची ५० लाख रुपयांची कमाई होत असल्याची माहिती तपासातून उघड झाली आहे.
तयार केले होते राज्यात सर्वत्र ड्रग्स तस्करीचे जाळे
आरोपी ललित पाटील आणि त्याचा भाऊ भूषण पाटील याने ड्रग्सचा उद्योग उभारला. भूषण पाटील पेशाने केमिकल इंजिनिअर असल्याने ते स्वतःच ड्रग्ज बनवत होता. तर विक्रीची जबाबदारी ललित पाटील पाहत होता. (Pune News) दोघे नाशिक जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. शिंदे गावात त्याने एका बंद कारखान्यात ड्रग्सचे उत्पादन सुरु केले. २०२१ सालापासून तो एमडी ड्रग्जचे उत्पादन करत होता. राज्यांतील अनेक भागांत ललित पाटील ड्रग्ज पोहचवत होता. त्याने राज्यात सर्वत्र ड्रग्स तस्करीचे जाळे तयार केले होते.
पुणे येथील येरवडा कारागृहात ललित पाटील होता. जून महिन्यापासून तो ससून रुग्णालयात उपचार घेत होता. त्याचे हे उपचार नावालाच होते. त्यामार्फत ससून रुग्णायलयात त्याची चांगलीच बडदास्त ठेवली जात होती. (Pune News) ससूनमधील सुरक्षेसाठी असणारे पोलीस, डाॅक्टर यांना हप्ते देवून तो सर्व उद्योग राजरोसपणे करत होता. सिगरेट ओढताना आणि हॉटेलमध्ये मैत्रिणासोबतचे त्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. ड्रग्सच्या काळ्या धंद्यातून महिन्याकाठी त्याची ५० लाख रुपयांची कमाई होत असल्याची माहिती तपासातून बाहेर आली आहे.
ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांची पोलीस कोठडी आज संपणार आहे. (Pune News) पुणे पोलीस दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करणार आहेत. या वेळी मुंबई पोलीस दोघांचा ताबा मागणार आहेत. मुंबई पोलिसांकडून न्यायालयात प्रोडक्शन वॉरंट दाखल करण्यात आले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : आम्ही मांजरीचे भाई… म्हणत दहशत माजवणाऱ्या अमोल आडेगावकरसह ५ साथीदारांवर ‘मोक्का’!
Pune News : शालेय पोषण आहाराच्या तांदळाची परस्पर विक्री; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल