(Pune News) पुणे : एका 25 वर्षीय तरुणाचे पुण्यातून अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तरुणाचे एका मुलीबरोबर प्रेमप्रकरण होते त्यातून मुलीच्या कुटूंबियांनी हा अपहरणाचा कट रचला आहे. या तरुणाला मारहाण करत मुलीला व त्याला विचारपूस केली तसेच परत मुलीबर संबंध न ठेवण्याच्या अटीवर तरुणाची सुटका केली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार शनिवारी पावणे अकराच्या सुमारास घडला आहे.
विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार…!
याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात शिवलिंग दिगंबर गायकवाड (वय ३०) यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार, पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बसवंत माधव गायकवाड (वय २५) याची अपहरण नाट्यातून सुखरूप सुटका झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात स्पर्धा परिक्षा करण्यासाठी आलेला हा तरुण मूळचा नांदेड जिल्ह्यातील आहे. तर तरुणीसुद्धा पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करते ती मुळची परभणी जिल्ह्यातील आहे. दरम्यान या दोघांची या माध्यमातून मैत्री झाली त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर मुलीच्या कुटूंबियांना दोघांमध्ये असणाऱ्या प्रेमसंबंधाची कुजबूज लागली असता त्यांनी तरुणी याबाबत विचारला केली. शिवाय या दोघांचे फोटो त्यांनी मोबाईलमध्ये पाहिले होते. त्यावरून कुटूंबियांना संशय आणखिच बळावडा.
त्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी थेट शनिवारी रात्री पुणे गाठले. मुलगा रात्री पावणे अकराच्या सुमारास जेवण करून मुलांसोबत रूमवर पायी चालत जात होता. त्याचदरम्यान, हा मुलगा शास्त्री रस्त्याने जात असताना अचानक कारमधून आलेल्यांनी त्याला जबरदस्तीने कारमध्ये बसवून त्याचे अपहरण केले. त्याला अचानक गाडीत घालून नेल्यानंतर याची माहिती पोलिसांना दिली.
तसेच, या घटनेची माहिती त्याच्यासोबत असणाऱ्या मुलांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मुलाचा शोध सुरू केला. तीन पथकांद्वारे या मुलाचा व अपहरणकर्त्यांचा शोध सुरू असतानाच दुसऱ्या दिवशी मुलगा सुखरूप असल्याचे समोर आले. या मुलाकडे चौकशी केल्यानंतर प्रेमप्रकरणातून त्याचे अपहरण झाल्याचे स्पष्ट झाले.
प्राथमिक चौकशीमध्ये मुलाने पाईपने मारहाण केली असल्याचे सांगितले. तसेच, प्रेमप्रकरणातून अपहरण झाले होते. मुलीच्या कुटुंबाने आम्हाला समोरासमोर बसवून विचारपूस केली. तसेच, हे प्रेमप्रकरण थांबविण्यास सांगत त्याला सोडून दिल्याचेही त्याने पोलिसांना चौकशीत सांगितले आहे. पोलिसांकडून मुलाचा जबाब घेऊन पुढील कारवाई करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक सुनिल माने यांनी दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!