Pune News : पुणे : मुंबईत मंत्रालयात धमकीचा फोन आल्याची घटना घडल्यानंतर सर्वांचीच तारांबळ उडाली. ही घटना ताजी असतानाच आज पुण्यात धमकी देणारा मेल आल्याने खळबळ उडाली आहे. दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात फिर्यादी उपचार घेत असतानाच त्याला धमकीचा मेल आला. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या मेलचा सखोल तपास करत आहेत. (Pune News)
गुन्हा दाखल करण्यात आला
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “मी भारतामध्ये सिरीयस बॉम्ब ब्लास्ट करण्याचा प्लॅन करत आहे. मी हिंदू धर्म आणि हिंदू धर्मातील महिलांना नष्ट करेन…” तसेच आय विल किल नरेंद्र मोदी… अशा आशयाचा हा मेल आहे. या मेलद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याचीही धमकी देण्यात आली आहे. अशी धमकी आल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून, धमकी देणाऱ्या व्यक्तीचा पोलीस कसून तपास करत आहेत. (Pune News)
दरम्यान, फिर्यादी व्यक्ती पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात आली असताना हा मेल आला. याप्रकरणी संबंधित व्यक्तीने तत्काळ अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार केली. यावरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. (Pune News)
संबंधित अज्ञात आरोपीचा शोध मेल आयडीवरुन घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मुंबईत दहशतवादी कारवाया घडवण्याची धमकी फोनद्वारे देण्यात आली होती. पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. आरोपी जेष्ठ नागरिक असून, मानसिक संतुलन बिघडल्याने त्याने असे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले. (Pune News)