Pune News : पुणे : मैत्रिणीला खुश करण्यासाठी घरफोडी करणाऱ्या पुण्यातील एका हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम करणाऱ्या हरियानातील शेफला चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. Pune News
रात्रीच्यावेळी करत होता घरफोड्या….
फुरकान नईम खान (वय २१, रा. पानिपत, हरियाना) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून तीन घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावत पोलिसांनी चोरी केलेले परकीय चलन जप्त केले आहे. खराडी येथील सिनॅप्स लॅब्स प्रा. लिमिटेड कंपनीच्या ऑफिसमध्ये ७ ऑगस्ट रोजी चोरी झाली होती. चोरट्याने तेथून ३ लाख ७ हजार ४९२ रुपयांचे भारतीय व परकीय चलन चोरी केले होते. याबाबत पवन चव्हाण (वय – ३०) यांनी चंदननगर पोलिसात फिर्याद दिली होती. (Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खान हा शहरातील मुंढवा येथील एका हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम करतो. तर रात्रीच्यावेळी तो घरफोड्या करत होता. बंद असलेली ऑफिसेस शोधून डल्ला मारण्यात तो पटाईत आहे. इमारतीवर तो पाईपच्या साह्याने चढतो. त्यानंतर तो बाथरुमच्या खिडकीच्या काचा काढून आत प्रवेश करत होता. (Pune News)
खराडी येथील कंपनीतून चोरलेले परकीय चलन कोणी त्याच्याकडून न घेतल्याने त्यापैकी काही त्याने टाकून दिल्याचे सांगतो. भारतीय चलन मात्र त्याने आपल्या मैत्रिणीवर उडविले, असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Pune News)
दरम्यान, पोलीस अंमलदार सुभाष आव्हाड आणि विकास कदम यांना तांत्रिक विश्लेषन आणि बातमीदारामार्फत खान याच्याबद्दल माहिती मिळाली होती. त्यानेच ही घरफोडी केली असून सध्या तो पिंपरी-चिंचवड येथे असल्याचे समजले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच सॅमसंग स्टोअर, खराडी मोर मॉलजवळ या ठिकाणी अशाचप्रकारे चोरी केल्याचे सांगितले. (Pune News)