(Pune News ) पुणे : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीवर आलेल्या एका ६० वर्षांच्या आजीच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरट्याने हिसकवण्याचा प्रयत्न केला. मात्र, एका १० वर्षाच्या (10-year-old ) नातीने चोरट्याचा हा प्रयत्न हाणून पाडल्याने तिचे परिसरात कौतुक केले जात आहे. ही घटना शिवाजीनगर परिसरातील मॉडेल कॉलनी भागात घडली आहे.
ऋत्वी घाग असं या धाडसी चिमुरडीचे नाव आहे.
शिवाजीनगर परिसरातील मॉडेल कॉलनी भागातील घटना…
मिळालेल्या महितीनुसार, मॉडेल कॉलनी येथे राहणाऱ्या लता घाग या ६० वर्षीय आजी संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आपल्या दोन नातींसोबत फुटपाथवरून मुलीच्या घरी जात होत्या. त्यावेळी एक तरुण दुचाकीवरून आला. त्याने आजीला पत्ता विचारण्याचा बहाणा केला.
आजी पत्ता सांगत असतानाच चोरट्याने आजूबाजूला पाहत डाव साधत आजीच्या गळ्यातील (grandmother’s chain )अडीच तोळ्याची सोन्याची चेन हिसकावण्याचा प्रयत्न केला. चोरटा साखळी चोरण्याच्या प्रयत्नात असतानाच आजीने जोरात चोर चोर असे ओरडण्यास सुरवात केली.
यावेळी आजीसोबतच असलेल्या ऋत्वीने धावत जात त्या चोराच्या तोंडावर हाताने मारण्यास सुरुवात केली. तर आजीने चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतू चोरट्याने हिसका देत तेथून पळ काढला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
दरम्यान, ऋत्विच्या या धाडसी कृत्याने पुणे शहरात तिचे कौतुक होत आहे. मात्र अशा चोरीच्या घटना वाढत असल्याने पुणे पोलिसांची मात्र डोकेदुखी वाढली आहे.
चोरींच्या संदर्भात अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
वडगाव शेरी परिसरातून चंदनाची चोरी करणाऱ्या तस्कराला चंदननगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
विद्युत रोहीत्रांच्या तब्बल २४ चोरींच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला यवत पोलिसांनी ठोकल्या बेड्या
प्रसिद्ध जॅार्ज हॅाटेलमध्ये चोरी; गल्ल्यातील रोकडसह मोबाइल लांबविला….!