Pune News : पुणे : एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून तरुणीला वाढदिवसानिमित्त घरी केक पाठविला. मात्र, तरुणीने हा केक घेण्यास नकार दिला. मी प्रेमाने दिलेला केक नाकारलाच कसा, याचा राग अनावर झाल्याने संतप्त झालेल्या तरुणाने थेट तरुणीच्या घराट एंट्री केली. तिच्याच घरात शिरून तिला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. कोंढवा परिसरातील एका सोसायटीत ही घटना घडली.
कोंढवा परिसरातील घटना
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकित सिंग (वय ३१, रा. केशवनगर, मांजरी रस्ता) याच्याविरुद्ध मारहाण, तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune News ) तरुणीने दिलेल्या फिर्यादीनंतर संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी तरुणी कोंढवा परिसरातील उंड्री येथील एका सोसायटीमध्ये राहते. अंकित या तरुणाचे तिच्यावर एकतर्फी प्रेम आहे. (Pune News ) या प्रेमापोटीच तरुणाने तरुणीच्या वाढदिवसाला तिच्या घरी केक पाठवला. मात्र, तरुणीचे प्रेम नसल्याने तीने तो केक नाकारला. त्यामुळे चिडलेल्या तरुणाने सोसायटीत जाऊन तरुणीला मारहाण तसेच तिचा विनयभंग केला.
दरम्यान, तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, या अगोदर देखील तरुण वेगवेगळ्या मर्गाने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता.(Pune News ) तिला सतत फोन करत होता. परंतु समोरून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने त्याने वेगवेगळ्या क्रमांकावरून तरुणीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. अखेर तरुणीने पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : आठव्या मजल्यावरून पडून बाप-लेकीचा मृत्यू..
Pune News : शाळकरी मुलीला मैत्रीच्या जाळ्यात ओढून बलात्कार; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
Pune News : सेवानिवृत्तीनंतर मिळालेली जमापुंजी शेअर बाजारात गुंतवली; तब्बल ४० लाखांची फसवणूक