Friday, June 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : “मी इथला भाई आहे…” म्हणत दहावीच्या विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला , चौघांवर गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 9 May 2026, 18:05

Pune News फुरसुंगी, ता. ९ : पुणे शहरालगतच्या फुरसुंगी परिसरात गुंडगिरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. “मी इथला भाई आहे… माझ्यावर चार गुन्हे दाखल आहेत,” अशी दहशत निर्माण करत चौघांनी मिळून दहावीच्या विद्यार्थ्यावर भररस्त्यात जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. हि घटना चंदवाडी रोडवरील कुस्ती आखाड्याजवळ ७ मे रोजी सकाळी साडेनऊ च्या सुमारास घडली आहे. आरोपींनी विद्यार्थ्याला काठ्यांनी बेदम मारहाण करत त्याचा मोबाईल फोडला आणि “आमच्याविरोधात तक्रार केली तर तुला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. Pune News

या प्रकरणी तेजस कामठे (वय १६) या अल्पवयीन विद्यार्थ्याने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार स्वप्नील भालेराव (वय १९), विवेक कामठे (वय १७), दादया खोमणे (वय १८) आणि एका १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलाच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ११५(२), ११८(१), ३(५), ३२४(४), ३५१(३), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune News

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस कामठे हा शिवशंभो महादेव न्यू इंग्लिश स्कूल, फुरसुंगी येथे दहावीचे शिक्षण घेत आहे. ७ मे रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास तो दुचाकीवरून मांजरी येथे कामासाठी जात होता. चंदवाडी रोडवरील कुस्ती आखाड्याजवळून जात असताना आरोपी त्यांच्याकडील वाहनातून फुरसुंगीच्या दिशेने येत होते. तेजस त्यांना क्रॉस करून पुढे गेल्यानंतर आरोपींनी वाहन वळवून त्याचा पाठलाग सुरू केला. काही अंतरावर त्याला जबरदस्तीने थांबवण्यात आले. “तू आम्हाला कट का मारला?” असा जाब विचारत आरोपींनी त्याच्यावर शिवीगाळ सुरू केली. तेजसने आपण कोणालाही कट मारला नसल्याचे सांगितले असता आरोपी अधिकच आक्रमक झाले. Pune News

यावेळी मुख्य आरोपी स्वप्नील भालेराव याने “तू आम्हाला ओळखत नाहीस का? मी इथला भाई आहे. माझ्यावर चार गुन्हे आहेत. माझ्या नादाला लागलास तर कार्यक्रम करतो,” अशी धमकी देत हातातील काठीने तेजसच्या डोक्यावर, पाठीवर आणि हातावर सपासप वार केले. इतर आरोपींनीही लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात तेजसच्या डाव्या कानामागे गंभीर जखम झाली असून रक्तस्राव झाला. ओठांनाही जबर मार लागून रक्त आले, तर पाठीवर काठीचे काळेनिळे वळ उठल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, मारहाण सुरू असताना तेजसने घरी फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी दादया खोमणे याने त्याचा मोबाईल हिसकावून जवळील भिंतीवर आपटत फोडून टाकला. त्यानंतर “आमच्याविरोधात केस केली तर तुला मारून टाकू,” अशी धमकी दिली. घटनास्थळी नागरिक जमा होऊ लागल्याचे पाहून आरोपी तेथून पसार झाले. Pune News

जखमी अवस्थेत तेजस थेट फुरसुंगी पोलीस ठाण्यात पोहोचला. पोलिसांनी त्याला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवले. उपचारानंतर दुसऱ्या दिवशी त्याने अधिकृत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून फुरसुंगी पोलीस पुढील तपास करत आहेत. भररस्त्यात अल्पवयीन विद्यार्थ्यावर झालेल्या या हल्ल्यामुळे फुरसुंगी परिसरात संतापाची लाट उसळली आहे. “शहरात अल्पवयीन टोळ्यांची दहशत वाढतेय का?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त-अधीक्षक अतुल कानडे

Friday, 5 June 2026, 21:43

फुले वाड्यात वटसावित्री पूजेला ‘नो एन्ट्री’! ऐतिहासिक वारसा जतनासाठी पुरातत्व विभागाचा मोठा निर्णय

Friday, 5 June 2026, 20:55
Good news for Maratha youth pursuing education! 8 special concessions on the lines of OBCs; What are the new rules?

शिक्षण घेणाऱ्या मराठा तरुणांसाठी आनंदाची बातमी! ओबीसींच्या धर्तीवर मिळणार 8 विशेष सवलती; काय आहे नवी नियमावली?

Friday, 5 June 2026, 20:14

उरुळी कांचन जवळील बोरीभडक परिसरात दुचाकीला चारचाकी कारची पाठीमागून जोरदार धडक; कारचालकावर गुन्हा दाखल, अपघात सीसीटीव्हीत कैद..

Friday, 5 June 2026, 19:28
Gunfire erupts in the air over business dispute! Thrilling shooting in broad daylight in Patus; 8 people in police custody

व्यवसायाच्या वादातून हवेत गोळीबार! पाटसमध्ये भरदिवसा गोळीबाराचा थरार; 8 जण पोलिसांच्या ताब्यात

Friday, 5 June 2026, 19:24

जागतिक संकटातही भारताची प्रगती! GDP वाढीचा दर 7.7 टक्क्यांवर

Friday, 5 June 2026, 19:09
Next Post

Pune News : कडक उन्हात कांदा काढणी करताना महिलेचा मृत्यू ; आंबेगाव तालुक्यातील घटना..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.