Pune News : पुणे : एका ३० वर्षीय महिलेने दोघांकडून प्रति महिना १६ टक्के व्याजदाराने ३ लाख ७० हजार रुपये उसने घेतले होते. या पैशांची महिलेने व्याजासह परतफेड देखील केली. असे असतानाही आणखी १४ लाखांची खंडणी मागणाऱ्या दोन सावकारांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकने अटक केली आहे. नवी खडकी परिसरात हा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे.
नवी खडकी परिसरातील धक्कादायक प्रकार
याबाबत कविता धिरज अगरवाल (वय ३०, रा. येरवडा) यांच्या तक्रारीवरुन ममता विशाल गोयल, निलेश उर्फ गोट्या राम बहिरट (वय-३२, रा. बोपखेल गाव, पुणे) यांना अटक केली आहे. (Pune News) आरोपींवर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादीला पैशांची गरज असल्याने त्यांनी ममता गोयल व गोट्या बहिरट यांच्याकडे पैशांची मागणी केली. (Pune News) आरोपींकडे सावकरी परवाना नसताना फिर्यादी यांना बहिरट यांच्या बँक खात्यातून ऑगस्ट २०२२ मध्ये ऑनलाइन ३ लाख ७० हजार रुपये महिना १६ टक्के व्याजाने दिले. फिर्यादी यांनी आजपर्यंत व्याज व मुद्दल असे एकूण ५ लाख ४८ हजार ४०१ रुपये रोख व ऑनलाईन दिले. त्यानंतरही आरोपींनी कविता अगरवाल यांच्याकडे १४ लाख रुपयांची मागणी केली.
दरम्यान, फिर्यादी महिलेने त्यांना पैसे देण्यास नकार दिल्याने, आरोपी ममता गोयल हिने फिर्यादीची चारचाकी गाडी व सहीचा कोरा चेक जबरदस्तीने घेतला. तसेच त्यांना फोन करुन शिवीगाळ करुन धमकी दिली. (Pune News) फिर्यादी यांनी याबाबत खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार अर्ज दिला. तक्रार अर्जाची चौकशी करुन दोन्ही आरोपींना अटक केली आहे.