राहुलकुमार अवचट
यवत, (पुणे) : उसने दिलेले पैसे परत देत नसल्याच्या कारणावरून न्हावरा (ता. शिरूर) येथून बेपत्ता झालेल्या तरुणाचा त्याच्याच मित्राने खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. (Pune News)
नाना ऊर्फ विठ्ठल आण्णा कितने (वय १९ वर्ष, रा. न्हावरा साखर कारखाना) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर बबलू ऊर्फ रवीराज ज्ञानदेव निंबाळकर (रा. न्हावरा ता. शिरूर) असे खून केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी निंबाळकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता. २४) नाना ऊर्फ विठ्ठल कितने हा न्हावरा साखर कारखाना या परिसरातून बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या आईने शिरूर पोलीस ठाण्यात दिली होती. सदर घटनेचा शिरूर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस तपास करीत असताना नाना कितने याचा मृतदेह हा यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पारगाव नदीपात्रात आढळला. (Pune News)
सदर घटनेचा अधिक तपास केला असता सदर नाना कितने याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. पथकामार्फत त्याच्याकडील असलेल्या मोबाईलचा अधिक तपास केला असता मोबाईल फोन वारंवार कितने याला बबलू ऊर्फ रवीराज निंबाळकर याने फोन केला होता. तसेच वारंवार पैसे मागत असल्याने मोटार सायकलवर बसवून मुळा मुठा नदीचे पुलावर नेऊन नदीपात्रात ढकलून देऊन व त्याचा ळून केल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली आहे. (Pune News)
सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे, पोलीस हवालदार जनार्दन शेळके, राहु मोमीन, योगेश नागरगोजे व शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, विक्रम जाधव, एकनाथ पाटील, गोपीनाथ चव्हाण, शिवाजी भोते, नाथसाहेब जगताप, नितेश थोरात, अशोक शिंदे, आण्णासाहेब कोळेकर, राजाराम गायकवाड, पोलीस मित्र दिपक बड़े यांच्या पथकाने केली आहे. तपास शिरूर पोलीस करीत आहेत. (Pune News)