Pune News पुणे – हातउसने पैसे मागण्यासाठी गेलेल्या महिलेकडे चक्क पैशाच्या बदल्यात शरीर सुखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना निगडी ओटा स्कीम येथे मंगळवारी (ता.२४) दुपारच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी एकावर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune News)
निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अण्णा धोत्रे (रा. ओटा स्कीम निगडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. तर याप्रकरणी एका महिलेने निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांची मैत्रीण या आरोपीकडे उसने पैसे घेण्यासाठी आरोपी अण्णा धोत्रे याच्याकडे गेल्या होत्या. महिलांनी आरोपीला हातउसने पैसे मागितले. तेव्हा आरोपीने उसने पैशाच्या बदल्यात महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली. तसेच पोलिसात तक्रार दिली तर बघून घेईन अशी धमकी ही आरोपीने दिली.
याप्रकरणी महिलेने निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपी अण्णा धोत्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास निगडी पोलीस करीत आहेत.