Pune News पुणे : घरफोडी करणार्या एका सराईत गुन्हेगाराला पुणे शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वारजे माळवाडी परिसरातील चैतन्य चौकातून अटक केली आहे. (Pune News)
रोहित वसंत पासलकर (वय-३२, रा. फ्लॅट नंबर ३०८, परिजात हाईट्स, जाधव नगर, रायकर मळा, धायरी, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्यांच्याकडून ५ घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून पोलिसांनी २ लाख रूपयाचा ऐवज जप्त केला आहे.
गुन्हे शाखेतील युनिट-क्र 3 च्या पोलिसांची कामगिरी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. गुन्हे शाखेतील युनिट-3 चे पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार हे वारजे माळवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करत होते. त्यावेळी पोलिस हवालदार राजेंद्र मारणे आणि पोलिस नाईक संजीव कळंबे यांना चोरीच्या पैशांची उधळपट्टी करणारा रोहित पासलकर हा चैतन्य चौकात येणार असल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचुन त्याला अटक केली. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याच्याकडून घरफोडी चोरीचे ५ गुन्हे उघडकीस आले. तसेच पोलिसांनी त्याच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल हन्डसेट असा एकुण २ लाख रूपयाचा ऐवज जप्त केला आहे.
दरम्यान, आरोपी रोहित पासलकर हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्याविरूध्द घरफोडी चोरी, जबरी चोरी, दुखापत यासारखे तब्बल २० गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, पोलिस उपनिरीक्षक राहुल पवार , सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संतोष क्षीरसागर , पोलिस हवालदार राजेंद्र मारणे, शरद वाकसे, किरण पवार, सुरेंद्र साबळे, संजित कळंबे, ज्ञानेश्वर चित्ते, सतिश कत्राळे, प्रताप पडवळ, प्रकाश कट्टे, साईनाथ पाटील, साईकुमार कारके, सोनम नेवसे आणि भाग्यश्री वाघमारे यांच्या पथकाने केली आहे.