Pune News | पुणे : पुण्यातील नर्हे परिसरातील बड्या महाविद्यालयात नोकरीस असलेल्या महिलेचा महाविद्यालयातील एचओडी कार्यालयात विनयभंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याच महाविद्यालयातील कम्प्युटर लॅब असिस्टंटने हे कृत्य केले असून त्याला सिंहगड रस्ता पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
मनेष विठ्ठल कडू (वय 35, यश प्लॅटिनम सोसायटी, पारी कंपनी चौकाजवळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. हा प्रकार या कॉलेजच्या अभियांत्रिकी विभागाच्या एचओडी कार्यालयात घडला.
एकटेपणाचा गैरफायदा…
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी या महाविद्यालयात नोकरीला आहे. तर आरोपी देखील याच महाविद्यालयाच्या अभियांत्रिकी विभागात कम्प्युटर लॅब असिस्टंट म्हणून नोकरीला आहे. आरोपी मनेष याने सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांना एचओडी सरांच्या कार्यालयातील पंखा चालू करण्याच्या बहाण्याने आत बोलावले. त्यानंतर त्यांच्या एकटेपणाचा गैरफायदा घेत त्यांना जवळ ओढण्याचा प्रयत्न करत अश्लील कृत्य केले. या संपूर्ण प्रकाराने धक्का बसलेल्या फिर्यादी यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Daund Crime : दौंडमधील गोहत्या करणाऱ्या टोळीवर तडीपारीची कारवाई
Hinjewadi Crime | वाहतूक पोलिसाला भर रस्त्यात महिलेने केली बेदम मारहाण; हिंजवडीतील घटना
Pimpri Crime | कोयता गॅंगची दादागिरी ! आम्ही इथले भाई म्हणत तरुणावर कोयत्याने वार; चिखलीतील घटना